Team India : पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर एक टिप्पणी केली आहे. या टिप्पणीला भारतीय चाहते कधीही विसरणार नाहीत. इंझमाम-उल-हकच्या कमेंटने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या डावात एका क्षणी विराट कोहली २३ चेंडूत १५ धावांवर खेळत होता. त्यामुळे एक वेळ अशी आली की, पाकिस्तानविरुद्ध १६० धावांचा पाठलाग करणं अशक्य वाटत होतं.
परंतु, विराट कोहलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने पुढच्या ३० चेंडूत ६७ धावा केल्या. यात त्याने त्याच्या शेवटच्या ११ चेंडूत ३६ धावा केल्या. कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा करून भारताला चार विकेट्सने विजय मिळवून दिला.
कोहलीच्या या खेळीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, विराट कोहलीकडे स्वबळावर सामने जिंकण्याची क्षमता आहे, विशेषत: जेव्हा संघ दबावाखाली असतो.
इंझमाम-उल-हक पुढे बोलताना म्हणाला की, ‘भारतीय संघाच्या विजयाचे सर्व श्रेय विराट कोहलीला द्यायला हवे. तो ज्या पद्धतीने खेळला ते शानदार होते. तो या सामन्यात चांगला खेळला आणि ही एक चांगली खेळी होती. त्याच्यात एकहाती सामने जिंकण्याची क्षमता आहे.
इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनल ‘द मॅच विनर’वर सांगितले की, ‘असे अनेक खेळाडू आहेत जे स्वबळावर सामने जिंकू शकतात. काही खेळाडू धावा करूनही सामने जिंकू शकत नाहीत. परंतु, असे काही खेळाडू आहेत जे असे सामने एकट्याने जिंकतात. विराट असा खेळाडू आहे आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.
भारतीय संघावर भाष्य करताना तो म्हणाला की, भारतीय संघात विराट कोहलीच चांगली कामगिरी करत आहे. भारतीय संघ मागील काही काळापासून खराब कामगिरी करत आहे. विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये येण्याने भारतीय संघ मजबूत झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
devendra fadanvis : लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाकडून कोणाची लागणार वर्णी? फडणवीसांनी दिली माहिती
Virat Kohli : विराटने ‘त्या’ ३ धावा काढल्या तर पाकिस्तान म्हणायला लागला चीटर, ICC ने नियम दाखवत बोलती केली बंद
Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल
bjp : ‘सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण…’