Share

मुख्यमंत्र्यांचे ते आरोप माजी मंत्र्यांने पुराव्यानिशी खोडले, भाजपला उघडे पाडत केली न्याय देण्याची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर येथे पार पडलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात होता. सेनेच्या कार्यकर्त्यांना तडीपार केल जात होतं असा आरोप शिंदे यांनी केला होता. याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुक पोस्ट करून एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे. त्यांनी लिहिले की, शिवसेनेच्या जिल्हा परिषद भाग्यश्री मोकाटे यांना तुम्ही न्याय दयावा.

त्यांनी लिहिले आहे की, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणावेसे वाटते की युती सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वी आपल्याच पक्षाची नगर जिल्ह्यातील जि. प. सदस्या भाग्यश्री मोकाटे हिच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे पदवीचा अभ्यास करत असताना एका गंभीर गुन्ह्यात बिचाऱ्या भाग्यश्रीचा काही संबंध नसताना गोवण्यात आले.

तिचं व कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त करण्यात आलं. आता हे खच्चीकरण तत्कालीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या भाजपने केलं का याचा आपण कृपया विचार करावा. कृपया भाग्यश्रीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

मी आपला स्वभाव जवळून बघितला आहे. आपण नक्कीच कृपादृष्टीने विचार करून शिवसेनेची जि. प. सदस्या भाग्यश्री मोकाटे हिला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा करतो. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने खच्चीकरण करणाऱ्या भाजप ची साथ सोडून पुन्हा महाविकास आघाडीसोबत याल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे प्राजक्त तनपुरे यांनी लिहिले आहे.

दरम्यान, काल औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या आरोपांचा विरोध केला. म्हणाले, बंडखोरांनी जो निर्णय घेतला त्याला काहीही आधार नाही, त्यामुळे लोकांना काहीतरी सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निधी दिला जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now