ठाण्यातील जिल्हा शाखेत दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला रात्री १२ वाजता यावर्षीही ध्वजारोहण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झाले. मात्र यासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली होती. (The flag was hoisted by Eknath Shinde,)
नौपाडा पोलीस स्टेशनने शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी नोटीस बजावली होती. या नोटिशीमुळे काहीकाळ ठाणे परिसरात तणावाची परिस्थिती होती.
‘मात्र शिवसेना कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सर्व शिवसैनिकांसोबत आम्ही जाणारच,’ असा निर्धार खासदार राजन विचारे यांनी बोलून दाखवला होता. त्याप्रमाणे ते ध्वजारोहण समारंभाला उपस्थित देखील राहिले.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ‘स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. सर्व ठाणेकर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहत असतात,’ असं ते म्हणाले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सर्वांना येऊ द्या. मोठ्या जल्लोषात देशभक्तीने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया.’ या संबंधित सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या होत्या. हा कार्यक्रम शांततेने व दिमाखात संपन्न झाला.
परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या भीतीने पोलिसांनी शिवसेना नेते राजन विचारे आणि केदार दिघे यांना पाठवलेल्या नोटिशीमुळे ठाणे परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता. मात्र कार्यक्रमानंतर तो निवळल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या-
करीना कपूरने लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर जोडले हात; म्हणाली, कृपा करून…
अंत्यदर्शनावेळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर सदावर्ते यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले…
ब्राम्हणांची पोरं खारीक-बदाम खातायत तर बहुजनांची पोरं.., काँग्रेस खासदाराची जीभ घसरली