स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139 वी जयंती आहे. या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते संदीत सिंग, आनंद पंडित यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. आता चाहत्यांना ‘स्वातंत्र वीर सावरकर’ या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.
हा चित्रपट स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये रणदीप हुड्डा त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील रणदीपचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सावरकरांच्या लूकमध्ये रणदीप हुड्डाला ओळखणे कठीण होत आहे.
रणदीप हुड्डाने ‘हायवे’, ‘सरबजीत’ आणि ‘बागी 2’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता सावरकर यांच्या भूमिकेतील रणदीप हुड्डाचा लुक पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. माहितीनुसार, ऑगस्ट 2022 पासून, चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार बेटांवर अशा विविध ठिकाणी केले जाणार आहे.
पोस्टरवर ‘हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है’ असे लिहिले आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट प्रस्तुत केला जात असून निर्माते आनंद पंडित, संदीप सिंग आणि सॅम खान निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा रूपा पंडित आणि जफर मेहदी यांनी पेलली आहे.
https://twitter.com/manjrekarmahesh/status/1530408675336105984?t=NVERsF7vQ6NLvY4rtKqMcg&s=19
अभिनेता रणदीप हुड्डा यांने यावर बोलताना एका मुलाखतीत म्हटले की, भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला आशा आहे की मी एका खऱ्या क्रांतिकारकाचे योगदानाचे आव्हान पेलू शकेन आणि इतक्या दिवसांपासून दडून राहिलेली त्यांची खरी कहाणी जनतेला सांगू शकेन.
तर दिग्दर्शक मांजरेकर म्हणाले, लोकांच्या मनात सावरकरांबद्दल वेगवेगळे आवृत्त्या असू शकतात, पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सावरकर वास्तविक जीवनात होते. ते प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक होते आणि आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना कोणताही भारतीय कधीही विसरणार नाही.