Share

पुण्यात ‘या’ ठिकाणी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पहिले हनुमान चालीसा पठण, ‘हिंदुजननायक’ म्हणून ठाकरेंचा उल्लेख

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू अशी भूमिका जाहीर केली होती. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर सध्या राजकिय वर्तुळातील विरोधी पक्षनेते टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच हनुमान जयंतीनिमित्त येत्या १६ एप्रिल रोजी राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती व सामुहिक हनुमान चालिसा पठण होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी सहा वाजता महाआरती घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाला मनसेच्या अधिकाऱ्यांसोबत इतर मंडळी उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे मशिदीवरील भोंग्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे.

खालकर तालीम चौकातील मारुती मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. पुण्यातील अनेक भागातील लोक याठिकाणी दर्शनासाठी येतात. आता हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या महाआरतीसाठी हजारो भाविक उपस्थित राहणार आहे. हनुमान जयंती असल्यामुळे मंदिरात दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. यानंतर संध्याकाळच्या महाआरतीसाठी राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी मंदिरात सायंकाळी ७ ते ११ या वेळात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. गेले दीड शतक खालकर मारुती मंदिरात पूजाअर्च्या , होमहवन ,धार्मिक विधी होत आहेत. या विधीमध्ये एकदाही खंड पडलेला दिसून आलेला नाही. याकारणानेच मनसे नेत्यांनी हे मंदिर महाआरतीसाठी निवडले आहे.

सध्या मशिदीवरील भोंग्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तवामुळे राज ठाकरेंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शविल्यामुळे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आहे. पुण्यातील इतर मनसे नेत्यांनी देखील राज ठाकरेंच्या या वक्तव्याला विरोध दर्शविला आहे.

अशा सर्व स्थितीतच राज ठाकरे यांना १६ एप्रिल रोजी पुण्यात महाआरतीसाठी बोलविण्यात आले आहे. यावेळी मनसे नेत्यांनी त्यांचा उल्लेख हिंदुजननायक असा केला आहे. दरम्यान मशिदीच्या वादावरुन येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली न उतरल्यास मशिदींसमोरच हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
‘मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज’, पोलिस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंनी दिल्या मोठमोठ्याने घोषणा
ब्रेकिंग! उदयनराजेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, सदावर्तेंचा मुक्काम पोलिस कोठडीतच
सलग पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या अडचणीत वाढ, कर्णधारपद जाणार?
रणबीर-आलियाच्या लग्नामुळे त्रासले शेजारी, केली पोलिसांत तक्रार; म्हणाले, तीन चार दिवसांपासून..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now