Share

Maratha Reservation: पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडेही बडवे आहेत, देशमुखांनी व्यक्त केला संताप

marath aarkshan amar deshmukh

मराठा आरक्षण(Maratha Reservation): एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कार्यरत दिसत आहे. काल (दिनांक २५) त्यांनी या मुद्द्यावर सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेतली होती.

शिवछत्रपती संघटनेचे नेते अमर देशमुख बैठकीला उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत. मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे, असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चाच झाली नाही. मी या बैठकीनंतर समाधानी नाही असे सांगत अमर देशमुख यांनी मराठा समाजाला घेऊन मोर्चे काढण्याचा इशारा दिला आहे. जे जुने जुने नेते आहेत, जे भाजपासाठी लांगूलचालन करतात त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या बैठकीमध्ये झालं, असाही टोला अमर देशमुख यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना, सारथी संघटना, नरेंद्र पाटील महामंडळ यासंदर्भात चर्चा झाल्याचं समाधान आहे. मात्र मुद्दा आरक्षणाचा होता त्याचं काही झालं नाही, असंही अमर देशमुख म्हणाले. अमर देशमुख यांनी खंत व्यक्त केली की, मुख्यमंत्र्यांनी बैठकीची वेळ दिली नाही. नुसती बैठक बोलावली. पुढच्या फळीतल्या लोकांनाच बोलायला दिलं. सर्वसामान्य माणसाला बोलायला दिलं नाही.

एकंदरीत पहिल्या फळीतल्या लोकांनीच बोलायचं असं झाल्याने महत्त्वाचे मुद्दे राहून गेले. ज्या स्वायत्त संघटना आहेत त्यांच्यावर बोललं गेलं. अमर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली की, सुरुवात झाली आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा आनंद आहे. पण मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की, पहिल्या फळीतले जे अडीच तीन वर्षांपूर्वीचे नेते आहेत.

त्या नेत्यांना न घेता विचारवंताना, न्यायाधीशांना समाजामध्ये संशोधन करणाऱ्या लोकांना घेऊन आपण आरक्षणासाठी पुढं जावं. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारमधील इतर नेते उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाची बैठक बोलवली तर शेवटच्या घटकालाही बोलता आलं पाहिजे, असं अमर देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या
‘तुमचं भाषण ऐकल्यावर हाय क्वालिटी शिवीच आठवली’, त्या शिक्षकाच्या पत्नीनेही प्रशांत बंब यांना झापलं
courage story: ..अन् बहिणीने भावांना वाचवण्यासाठी कालव्यात घेतली उडी, पुढं जे घडलं ते वाचून डोळे पाणावतील
एन. व्ही. रमणा सरन्यायाधीश पदावरून पायउतार; अखेरच्या दिवशी मागितली माफी, म्हणाले…
Kirit Somaiya : वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहा, ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्यांना कोर्टाने झापलं   

राजकारण इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now