शिवसेनेला राज्यभरात मोठी गळती लागली असतानाच बीड जिल्ह्यातून मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना बसणार आहे. बीड जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेनेचा झेंडा डौलात फडकवणारा कट्टर शिवसैनिक आता शिंदे गटात सामील होत आहे. (The first candidate given by Balasaheb in the Shinde group; Khindar to Shiv Sena in Beed district)
बीडचा सुरेश नवले यांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली त्यानंतर ते लवकरच शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच नवले यांना बाळासाहेबांनी शिवसेनेचा बीड जिल्ह्यातील पहिला उमेदवार म्हणून शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली होती.
आता औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर आणि सुरेश नवले हे शिंदे गटाला समर्थन देणार आहेत,असा दावा केला. सुरेश नवले यांच्या राजकीय पुनरागमनासाठी शिंदे गटाला पाठिंबा देणे त्यांना फायदेशीर ठरू शकते, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
१९९५-९६ च्या काळात बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. तो उमेदवार सुरेश नवले होते. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने शिवसेनेसाठी महत्त्वाचे असणारे सुरेश नवले आता शिंदे गटाला जाऊन मिळणार असल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.
पूर्वी सुरेश नवले हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक मानले जात. शिंदे गटात सामील झाले तर नवले यांना कोणत्या प्रकारचे राजकीय फायदे होतील हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.परंतु याबाबत नवले यांच्याकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
सुरेश नवले हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात. या परिस्थितीत एकनाथ शिंदे गटाची त्यांनी सोबत केली तर बीड जिल्ह्यातील शिवसेनेची राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना आव्हान देणारा बृजभूषण सिंह मुंबईत येणार? मनसे कसं स्वागत करणार?
सत्तारांचा घाट्याचा सौदा? ठाकरेंमुळे मिळालेले मंत्रीपद शिंदे सरकारमध्ये गमावण्याची शक्यता
आज लोकसभा निवडणूक झाली तर, राज्यात शिंदे गट की ठाकरे गट मारेल बाजी? जाणून घ्या