आपला देश हा विज्ञानवादी म्हणून वाटचाल करत असाल तरी आजही समाजात अशा अनेक प्रथा दिसून येतात, जिथे पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीला तिच्या अलकारांचा त्याग करावा लागतो. गळ्यातील मंगळसूत्र तोडणं, कुंकू पुसणं, पायातली जोडवी काढली जाणं या इत्यादी गोष्टी तिला काढाव्या लागतात.
एकीकडे या प्रथा पाळणारे लोक आहेत, तर दुसरीकडे एका गावात या प्रथांना मोडण्याचा निर्णय गावातील ग्रामपंचायतने घेतला आहे. हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हेरवाड’ आहे. या गावातील ग्राम पंचायतीचे या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार केला आहे. हा आदर्श घेऊन आता राज्यभरात विधवा प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला.
हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झालं आहे. विधवा प्रथा बंद करण्याचा शासन निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण समोर आलं आहे. नाशिकमधील सुगंधाबाई चांदगुडे यांचं हे उदाहरण आहे. त्यांनी पतीच्या मृत्यूनंतर आता 13 वर्षांनी पायात जोडवे आणि कपाळाला कुंकू लावलं आहे.
सुगंधाबाई चांदगुडे यांच्या पतीचं लग्न तेरा वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यानंतर सुगंधाबाई यांनी जोडवे घातलेले नाहीत, की कुंकू लावलं नाही. मात्र, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा बाहार आला. परिवर्तन आपल्या घरातून झालं पाहिजे, यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं त्यांचा मुलगा कृष्णा चांदगुडे हे अभिमानाने सांगतात.
सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला ग्रामपंचायतीचे परिपत्रक दाखवलं. यावर सुगंधाबाई चांदगुडे यांनी सुधारणावाद स्विकारला. सुगंधाबाई यांनी घेतलेल्या या निर्णयाची पूर्ण नाशिकसह राज्यात चर्चा होत आहे. अशा प्रकारचा आदर्श सर्वानी घ्यावा आणि समाजात परिवर्तन आणावं अस मतं सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे व्यक्त करतात.
सध्या सुगंधाबाई यांचा आदर्श समाजातील इतरांनी घेणं महत्वाचे आहे. सुगंधाबाई यांचा मुलगा समाजातील अनिष्ठ प्रथा थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करतो. असे सुगंधाबाई म्हणाल्या. तसेच विधवा असल्याने समाजात वेगळी वागणूक मिळते याचे दुःख त्यांनी बोलून दाखवले. मात्र, समाजातील निकृष्ट प्रथा मोडण्यासाठी ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयावर त्या खुश आहेत.