Share

संपलेली बिडी घराबाहेर फेकली अन् संपूर्ण कुटुंबाचा झाला अंत, घटनेने महाराष्ट्रात हळहळ

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक रुपयांच्या बिडीने संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. यामध्ये आई वडील आणि मुलगा असा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही दुर्दैवी घटना देगलूर तालुक्यातील बल्लूर या गावात घडली आहे. एक रुपयांच्या बिडीमुळे अख्ख कुटुंब संपलं आहे. बिडी पिऊन झाल्यावर ती घरातील फवारणी करणाऱ्या टाकीवर फेकल्याने टाकीत असलेल्या पेट्रोलचा भडका उडून घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत सूर्यकांत माधवराव सक्रप्पा जे ५२ वर्षांचे होते. तर गुबाई सूर्यकांत सक्रप्पा वय ५० वर्ष आणि मुलगा सूर्यकांत सक्रप्पा वय वर्ष २०वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. झालेली घटना सविस्तर म्हणजे, सूर्यकांत सक्रप्पा यांची शेतीची कामे सुरू होती. पिकांवर फवारणी करण्यासाठी त्यांनी फवारणी टॅंक आणली होती.

त्यासाठी त्यात पेट्रोल सुध्दा भरून ठेवलं होतं. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी सूर्यकांत सक्रप्पा आणि त्यांची पत्नी, मुलगा नेहमीप्रमाणे घरात बसले होते. सूर्यकांत यांना बिडी पिण्याची सवय असल्याने त्यांनी बिडी पेटवली. त्यानंतर बिडी संपणार असल्याने पेटती बिडी घराबाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण ती बिडी फवारणीच्या टॅंकमध्ये पडली.

टॅंकमध्ये पेट्रोल असल्याने जोराचा भडका झाला. पाहता पाहता मोठा स्फोट झाला. या स्फोटात सूर्यकांत यांच्यासह पत्नी गुबाई आणि मुलगा कपिल यांच्यावर आगीचा भडका जाऊन पडला. आग एवढी भयंकर होती की यात तिघेही गंभीर भाजले गेले.

देगलूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना आज तिघांनीही प्राण सोडले. तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now