आपण अनेकदा चित्रपटात (film) दोन किंवा अधिक नायक पाहिले आहेत. भविष्यात हे चित्रपट कसे प्रदर्शन करतील हे महत्त्वाचे नाही, परंतु प्रेक्षक आपल्या आवडत्या स्टार्सला एकाच चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या वर्षी आणि पुढच्या वर्षी असे अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्यात दोन नायक एकत्र येऊन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील.(The film is set to hit the box office this year)
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनीही असाच धमाका केला होता. त्यामुळे येत्या काळात बडे मियाँ छोटे मियाँ, आरआरआर, पठाण, विक्रम वेध असे अनेक सिनेमे पाहायला मिळणार आहेत. दोन मोठ्या स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. तसेच चित्रपटाची कथा नक्की काय असणार आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बडेमियाँ छोटेमियाँ (BadeMiyan ChoteMiyan)
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर वाशू भगनानी त्याचे निर्माते आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी अक्षय आणि टायगरचे चाहते प्रचंड उत्सुक आहे.
पठाण (Pathan)
शाहरुख खानचा हा कमबॅक चित्रपट आहे. यामध्ये शाहरुख रॉ एजंट बनणार असून जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
आरआरआर (RRR)
बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. यामध्ये साऊथ इंडस्ट्रीतील बडे कलाकार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरनेच धुमाकूळ घातला आहे.
आदिपुरुष (Adipurush)
या चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारत असून सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा कोणताही लूक किंवा इतर काही माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या दोघांना पहिल्यांदाच एकत्र पाहणे रंजक ठरणार आहे.
विक्रम वेध
या चित्रपटात सैफ अली खान देखील आहे पण यात तो निगेटिव्ह रोल करत नाही तर पोलीस आहे. तर दुसरीकडे हृतिक रोशन एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
फोन भूत
फोन भूतमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर दिसणार आहेत. त्याचबरोबर कतरिना कैफही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट जुलै 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण
‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’
मोठी बातमी! भर चौकात प्राध्यापिकेला जाळणाऱ्या तरुणाला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप