Share

‘नगाडा संग ढोल’ गाण्यावर महिला IAS ने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

आज सोशल मीडिया (Social media) हे असे माध्यम बनले आहे की, जिथे सर्वसामान्यांपासून ते बड्या दिग्गजांपर्यंत सर्वचजण धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. इथे कधी एखाद्याचा व्हिडीओ रातोरात व्हायरल होतो आणि दुसऱ्याच क्षणी ती व्यक्ती सर्वांसाठी स्टार बनलेली असते. तसेच कधी-कधी एखादा फोटोच चर्चेसाठी पुरेसा असतो. या गोष्टीमुळे अनेक सामान्य लोकही स्टार बनली आहेत.(The female IAS danced to the tune of ‘Nagada Sang Dhol’)

असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केरळमधील एक आयएएस अधिकारी (IAS Officer Dance Video) विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. लोक हा व्हिडिओ पाहत आहेत आणि त्याला खूप पसंत करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसणार्‍या महिला आयएएसचे नाव दिव्या एस अय्यर (IAS Divya S Iyer) असल्याचे सांगितले जात आहे.

https://www.facebook.com/100002911140689/videos/5094222280615985/

दिव्या एस अय्यर या केरळच्या पथनमथिट्टा जिल्ह्याच्या डीएम असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, IAS दिव्या, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण स्टारर ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ मधील ‘नागाडा संग ढोल…’ या गाण्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपसह नाचताना दिसत आहे. असे सांगितले जात आहे की डीएम अय्यर महात्मा गांधी विद्यापीठ (MG University, Kerala) च्या कला महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचल्या होत्या, जिथे विद्यार्थ्यांचा एक ग्रुप सराव करत होता.

हा व्हिडीओ फेसबुकवर अजिन पठानमथिट्टा (Ajin Pathanamthitta) नावाच्या युजरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्स मूव्ह्स.’ हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, सोशल मीडिया वापरकर्ते डीएम मॅडम यांचे भरभरून कौतुक करत आहेत.

वापरकर्ते आयएएस दिव्या मॅडमचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत मिसळल्याबद्दल कौतुक करत आहेत. स्थानिक बातम्यांनुसार, दिव्या मॅडम महात्मा गांधी विद्यापीठ (MG University, Kerala) च्या कला महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचल्या असताना विद्यार्थ्यांच्या वारंवार विनंतीनंतर त्या नृत्यात सामील झाल्या.

महत्वाच्या बातम्या-
काश्मिरी पंडितांचं दुःख दाखवलं आता मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवा, IAS अधिकाऱ्याची मागणी
असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही? IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला प्रश्न
हनिमूनच्या रात्रीचं पत्नीला कळालं IAS पतीचं ‘ते’ भयानक सत्य, तरी ३२ वर्ष गप्प बसून करत होती मुकाट्याने संसार
वडिलांचे पंक्चरचे दुकान, आई विकायची बांगड्या; जिद्दीच्या जोरावर बनला IAS अधिकारी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now