दरवर्षी अनेक जणांचा बुडून मृत्यू होतो. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण आपला जीव गमवतात. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी धक्कादायक घटना जालना येथे घडली आहे. लेकाला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी मारली, क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं.. ही घटना जालना येथे घडली आहे. मोती तलावात माणिक बापूराव निर्वळ हे दुपारी आपल्या तीन मुलांना सोबत पोहण्यासाठी घेऊन गेले होते. मोठा मुलगा आकाश (वय 14) हा पोहत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडून गटांगळ्या खाऊ लागला. मुलाला बुडताना पाहून वडील माणिक यांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पोहोत जात त्यांनी मुलगा आकाशला पकडले. मात्र त्यादरम्यान आकाशने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली.
आकाशने मिठी मारल्यामुळे वडिलांना पोहता आले नाही. त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. तसेच त्याठिकाणी माणिक निर्वळ यांची दोन मुले पोहत होती. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वडील आणि भावाच्या मदतीसाठी मोठ्यांनी आरडाओरडा करून गावातील लोकांना बोलावले.
दरम्यान, पिता – पुत्राच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण जिल्हयावर देखील शोककळा पसरली असून घडल्या घटणेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे वेळीच प्रसंगावधान राखल्याने दोन मुले वाचली.