Share

रणवीर सिंगच्या ‘या’ निर्णयाने नाराज झाले होते वडील, मुलाची वाटू लागली होती लाज, वाचा किस्सा

रणवीर सिंग (Ranveer Singh) हा असा स्टार आहे, जो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनेता त्याच्या करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास घाबरत नाहीत, परंतु तो असे प्रयत्न देखील करतो, जे इतर कोणत्याही नायकासाठी करणे सोप्पे नाही. आज जरी रणवीर अशा टप्प्यावर पोहोचला आहे की त्याच्या आई-वडिलांना अभिनेत्याचा अभिमान वाटला पाहिजे, पण एक वेळ अशी होती जेव्हा रणवीरचे वडील त्याच्यावर रागावले होते आणि त्यामागचे कारण होते रणवीरचा निर्णय होता.(Ranveer Singh, Zahirat, father, Bollywood actor)

रणवीर सिंगची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने नेहमीच अत्यंत कठीण भूमिकाही अत्यंत गांभीर्याने साकारल्या आहेत. यामुळेच रणवीर काळाच्या ओघात मोठा स्टार म्हणून उदयास आला आहे. रणवीरच्या प्रत्येक पावलावर त्याचे कुटुंब नेहमीच उभे राहिले, पण एक प्रसंग असा आला की अभिनेत्याची जाहिरात पाहून रणवीरचे वडील संतापले होते.

रणवीर सिंगने अनेकवेळा कबूल केले आहे की त्याचे त्याच्या वडिलांसोबत घट्ट नाते आहे. त्याने सांगितले आहे की त्याच्या वडिलांनी त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात त्याला सोडले नाही. मात्र, एक वेळ अशी आली की त्याचे वडील रणवीर सिंगवर रागावले होते. २०१४ मध्ये रणवीरने सांगितले होते की, एकदा त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की, अनेक मोठे स्टार जाहिरातींचे शूटिंग करून खूप पैसे कमावतात, तू तेच का करत नाहीस. यावर रणवीर सिंगने वडिलांना सांगितले होते की, योग्य वेळ आल्यावर तोही असेच करेल.

त्याच वेळी, जेव्हा त्याने आपल्या वडिलांना कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या ऑफरबद्दल सांगितले तेव्हा त्यांना विशेष आनंद झाला नाही. तसेच ते रणवीरला एवढच म्हणाले होते की तू काय करत आहेस हे तुला माहीत असले पाहिजे. त्यांच्या या बोलण्यावरून रणवीरला वाटले की त्याने ही जहिरात करणे त्याच्या वडिलांना आवडलेलं नाही.

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रणवीर सिंग नुकताच ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात दिसला, जो फ्लॉप ठरला. या चित्रपटातून शालिनी पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो आलिया भट्टसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. तसेच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’मध्येही तो आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
अनुष्का शर्माने केली रणवीरची पोलखोल; म्हणाली, रणवीर खूपच घाणेरडा, त्यामुळेच मी त्याला.. 
मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन करु शकतो, कारण ती रणवीर सिंगच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अंबानींची सून राधिका मर्चंटचा अरंगेत्रम सोहळा, सलमान, रणवीरसह ‘या’ दिग्गजांची हजेरी; पहा फोटो..
तेव्हा मला खुप राग येतो, अनुष्का शर्मासोबतच्या ब्रेकअपबाबत रणवीर सिंगने सोडले मौन

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now