कलाकाराने यशाची उंची गाठली की त्याने मागील आयुष्यात केलेले कष्ट हे कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. सर्वांना फक्त त्या कलाकाराची प्रसिध्दी आणि उंचावलेले राहणीमान दिसते. KGF मधील अभिनेता कुमार गौडा बाबतीतही असेच काही झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कुमारची ओळख आज सुपरस्टार अभिनेता म्हणून झाली आहे.
कुमारने यशच्या पात्रामुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. कुमारचा जन्म कर्नाटकातील बूवनहल्ली या गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. कुमारचे वडील हे स्थानिक परिवहन संस्थेमध्ये काम करत होते. ते BMTC मध्ये चालकाच्या पदासाठी काम करत होते.
परंतु आज कुमार इतका मोठा झाला असला तरी त्याचे वडील याच पदावर काम करत आहेत. त्यांनी आपली नोकरी सोडलेली नाही. कुमारची आई एक गृहीणी आहे. कुमारच्या कुटांबाने अनेक हालाकीचे दिवस पाहिले आहेत. कुमारचे बालपण म्हैसूरमध्ये गेले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कुमारने सिनेक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. शिक्षण घेत असताना त्याला लहानमोठ्या भूमिका मिळू लागल्या आपल्या अभिनयातून त्याने सर्वांनाच चकीत करुन सोडले. कन्नड कलाविश्वात कुमारची एक वेगळी ओळख तयार झाली.
यानंतर कुमारला वेगवेगळे चित्रपट मिळू लागले. या चित्रपटांच्या यशानंतर 2018 मध्ये कुमारने केजीएफमध्ये काम केले. या चित्रपटाला लोकांकडून चांगलीच पसंती मिळाली. त्यासोबतच चित्रपटात कुमारने केलेल्या यशच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले.
पुढे कुमारची ओळख चाहत्यांसाठी केजीएफमधला यश म्हणूनच झाली. जागतिक स्तरावर कुमार प्रसिद्धीझोतात आला असला तरी त्याच्या कुटुंबाने आपले जूने दिवस विसरलेले नाहीत. दरम्यान कुमारला दोन मुले असून त्याच्या पत्नीचे नाव राधिका आहे. कुमार कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देतो.
महत्वाच्या बातम्या
लाचखोरांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांचे काय करण्यात येते? ऐकून तुमचं डोकं चक्रावेल
..तर स्वत:साठी फाशीचा दोर आवळलाच समजा, मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे तक्रार करताच राऊतांचा इशारा
हिमालया कंपनी वादाच्या भोवऱ्यात, प्रॉडक्ट्समध्ये हलालचा वापर? लोकांनी टाकला बहिष्कार
सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर.., शरद पवार भाजपवर पुन्हा बरसले