दलित मुलाच्या प्रेमात पडल्याने बापाने मुलीला संपवलं, मुलीला तडफडताना पाहून आईने केलं ‘हे’ कृत्य

कर्नाटकात एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचे दलित मुलावर प्रेम असल्याने तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.  स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की म्हैसूरमधील कांगगुरी गावातील १७ वर्षीय मुलगी पेरियापटना येथील महाविद्यालयात शिकत होती आणि ती वोक्कलिगा समुदायाची होती.(Murder, Periyapatna, love affair, investigation report)

मृत तरुणीचे शेजारच्या गावात राहणाऱ्या एका दलित मुलावर प्रेम होते, मात्र कुटुंबीय या नात्याला विरोध करत होते. ज्या ठिकाणी प्रथम मृतदेह ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. मुलीचे वडील सुरेश (45) आणि आई बेबी यांनी मुलीला मुलाशी बोलण्यास मनाई केली होती, मात्र मुलीने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी मंगळवारी रात्री उशिरा तिचा गळा आवळून खून केला.

ही घटना घडली त्यावेळी मुलीची आई तेथे उपस्थित होती. मुलगी बेशुद्ध पडल्यावर आईने मुलीच्या तोंडावर पाणी शिंपडले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आई-वडिलांनी रात्रीच मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि वडिलांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सुरेश आणि त्याची पत्नी बेबीलाही अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटनेच्या सुमारे महिनाभरापूर्वी मुलीने तिच्या पालकांविरुद्ध पेरियापटना पोलिसांकडे तक्रारही केली होती, त्यानंतर पोलिसांनी तिला म्हैसूर येथील शासकीय बालिकागृहात पाठवले होते. मात्र पालकांनी दोन आठवड्यांनंतर मुलीला सन्मानाचे कारण देऊन घरी आणले. त्यांनी म्हैसूर जिल्हा बाल कल्याण समितीला (CWC) लेखी कळवले होते की ते तिला नुकसान पोहचवणार नाहीत.

म्हैसूर जिल्हा बाल कल्याण समितीचे म्हणणे आहे की मुलगी आधीच तिच्या पालकांसोबत जाण्यास नकार देत होती, परंतु तिच्या पालकांनी तिला समजवल्यानंतर ती त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाली. अधिकाऱ्यांनी तपास अहवाल सादर केल्यानंतरच मुलीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-
कश्मीरात हिंदूचे खून होताहेत, शहा राजीनामा द्या अन् क्रिडामंत्री व्हा, तुम्हाला क्रिकेटमध्येच इंटरेस्ट आहे 
ओम पुरीच्या पत्नीचे खळबळजनक आरोप, केकेचा खूनच झालाय, CBI चौकशी व्हावी
महाराष्ट्र हादरला! जन्मदात्या आईने पोटच्या मुलांचा केला खून, नंतर जाळली प्रेतं; कारण वाचून हादराल
देश हादरला! व्हिडीओ बनवण्याच्या बहाण्याने बोलावलं आणि मित्रांनीच केला गायिकेचा खून