शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. (The farmer s son wrote a letter to the minister in blood)
अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतक-यांचा सर्पदंशाने जीव जात आहे, त्यांनी असा काय गुन्हा केला? असा सवाल संतप्त शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आणि शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज दिली जावी, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे.
कागल तालुक्यातील गोरंबे येथील शेतकरी कुटुंबांतील निलेश कोगनोळे या मुलाने हे पत्र लिहिले आहे. ‘गेले पाच, सहा दिवस राजू शेट्टी हे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्याला दिवसा दहा तास वीज पुरवठा मिळावी ही मागणी आहे.सरकारने ही मागणी करुन दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा’ या आशयाचे पत्र कोगनोळे यांनी लिहिले आहे.
सध्या हे पत्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होतं आहे. शेट्टी यांनी देखील यांनी यावर फेसबुक पोस्ट करत ते पत्र व्हायरल केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये शेट्टी म्हणतात, ‘हाडांची काड अन रक्ताच पाणी झालं शेतक-यांच्या पोरांनी रक्तान पत्र लिहली राज्यकर्त्यांनो आतातरी तुम्हाला पाझर फुटणार आहे का ? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी केला आहे.
https://www.facebook.com/Rajushetti27/posts/490873909067359
तसेच पुढे पोस्टमध्ये शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. ‘वेळीच सावध व्हा नाहीतर जी पोर वाघाशी आणि गव्याशी झुंज देतात त्यांना तुम्हाला तुडवायला वेळ लागणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे देखील शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर गेल्या ५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई हादरली! सोशल मीडियावर झाली मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून शिक्षिकेला दारू पाजली अन्..
पिंपरीतील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह ३ तरुणींची सुटका
३ रुपयांच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ, गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ६ कोटी; मिळाला बंपर परतावा
आज करोडोची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते