Share

शेतकऱ्याचा नाद खुळा! एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा आज करोडपती झाला; शेतीत केला ‘हा’ भन्नाट प्रयोग

santosh shinde

अलीकडे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एकेकाळी सालगडी करणारा शेतकरी आज 6 कोटी रुपयाची उलाढाल करतोय.

अनेकदा आपला नकारात्मक गैरसमज होतो की, शेतीतून परवडत नाही, हवं तसं उत्पादन मिळत नाही मात्र आपण जर नवीन प्रयोग केला तरी नक्कीच शेतीतून चांगला फायदा मिळू शकतो. याचे जीवंत उदाहरण आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तसेच यासाठी आवश्यकता असते ते योग्य नियोजन, बाजारपेठेची व्यवस्थित माहिती, कष्ट करण्याची तयारी.

तर जाणून घेऊया या शेतकऱ्याबद्दल.. संतोष शिंदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मराठवाडा विदर्भ सीमेवरील असलेल्या ‘पानकनेरगाव’ येथे हे राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी ते सालगडी म्हणून काम करायचे, मात्र त्यानंतर त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, त्यांनी एक गुंठा शेतीमध्ये नर्सरी व्यवसाय सुरू केला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर त्यांनी नर्सरी मोठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अभिमानाची बाब म्हणजे हळूहळू नर्सरीचा व्यवसाय वाढवत शिंदे यांनी आज तब्बत 8 एकरात नर्सरी चा व्यवसाय उभा केला आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

सुरुवातीला त्यांनी झेंडूच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची, झेंडू, टोमॅटो, पपई,टरबूज, खरबूज यांसारखे अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले. यासाठी सर्वात आधी त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले.

दरम्यान, तुमचाही विश्वास बसणार नाही, मात्र शिंदे हे वर्षाला जवळजवळ 6 कोटी रुपयांची कमाई करत आहेत. रोपटे उत्तम दर्जाचे आहेत त्यामुळे मागणी जास्त आहे. शिंदे हे रोपे थेट घरच्या पत्त्यावर पाठवतात. तसेच त्यांनी अनेकांना रोजगार देखील निर्माण करून दिला आहे. आज यांच्या नर्सरीत 100 कामगार कामाला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
महापुरूषांना बदनाम करून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे- राज ठाकरे
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे…
‘या’ कारणामुळे निवडणुका पुढे ढकलल्या, राज ठाकरेंनी सांगितले खरे कारण
बिग ब्रेकींग! अखेर एसटी संपावर तोडगा निघाला; उद्या विधीमंडळात होणार मोठी घोषणा

इतर राज्य शेती

Join WhatsApp

Join Now