माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो. स्वतःच नशीबच स्वतः लिहू शकतो, असं म्हणतात ते खरंय. सिनेमाच्या झगमगत्या दुनियेत तर असं अनेक कलाकारांसोबत होतं. खूप स्ट्रगलनंतर एखाद्या कलाकाराचं मोठं नाव होतं. तेव्हा सुरुवातीचे कठीण दिवस त्याला कायम लक्षात राहत असतात. अशीच एक खरी स्टोरी आहे, सुपरस्टार आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या एका माणसाची. जो आज मोठा लोकप्रिय अभिनेता बनलाय. (The famous actor who ruled Bollywood was ‘Ha..)
आज सिनेमा इंडस्ट्रीत रोनित रॉय त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तोच रोनित रॉय एकेकाळी अमीर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायचा. अनुराग कश्यपच्या ‘उडान’ सिनेमात त्याने काम केले आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ही गोष्ट उघड केली होती. तो म्हणतो की, मी मुंबईला १५ वर्षांपूर्वी आलो होतो. खूप स्ट्रगल केलं. मला मोठा अभिनेता बनायचं होतं. खूप पैसे कमवायचे होते. श्रीमंत माणूस बनायचं होतं. मला वाटायचं मुलींनी माझ्यामागे फिरावं.
पुढे रोनित रॉय म्हणतो की, मी ६ वर्ष सिनेमा इंडस्ट्रीत स्ट्रगल करून काही करू शकलो नाही. पण एक पक्क समजलं होतं. आपण अभिनेता बनण्यासाठीच मुंबईत आलो आहे. मी आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्या २ वर्षांत मी खूप गोष्टी शिकलो. अमीर खान फार मेहनती आहेत. त्यांची आपल्या कामावर निष्ठा आहे.
खरं तर ही गोष्ट मला सांगायची नाही. त्यांना वाटेल की, त्यांचं नाव वापरून मी प्रसिद्धी मिळवत आहे. पण हे सत्य आहे की, मी आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं. तेव्हा अनेक गोष्टी शिकलो, त्या दरम्यान स्वतःची कंपनी सुरु केली. अमीर खानने खूप श्रीमंत होणं, महागड्या कार घेणं या गोष्टी माझ्या डोक्यातून बाहेर कडून टाकल्या. त्यांच्यामुळे मी ऍक्टिंगवर फोकस केलं, असे रोनित रॉय म्हणाला.
अभिनेता बनणं आणि स्टारडम यांचा काही संबंध नसतो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यानंतर मी काम करत होतो. तेव्हा एकता कपूरच्या २ सिरीयल टीव्हीवर येणार होत्या. मी ऑडिशन दिले आणि मला संधी मिळाली. तिथून सुरुवात झाली ते आजपर्यंत या क्षेत्रात काम चालूच आहे.असेही रोनित रॉयने सांगितले.
रोनित रॉयने छोट्या पडद्यावर कसौटी जिंदगी की, क्योंकि सास भी कभी बहू थी, अदालत या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्या मालिका खूप हिट झाल्या. पुढे त्याने आर्मी, २ स्टेटस्, हलचल, काबील, उडान या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशा प्रकारे मेहनतीच्या बळावर रोनित रॉयने सिनेमा इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
खूपच रॉयल लाईफ जगते शिल्पा शेट्टी, दुबई, लंडनमध्ये आहे कोट्यवधींचे फ्लॅट; ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीण
‘या’ कारणामुळे मला माझी ब्रा धुवायला आवडत नाही’; सई ताम्हणकरच्या वक्तव्याने खळबळ
IPL मध्ये फ्लॉप गेल्यानंतर ‘या’ स्फोटक फलंदाजाला भारतीय संघातून मिळाला डच्चू, कारकीर्द संपणार?






