आयपीएल 2022 मध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक जबरदस्त खेळी केली आहे. रोहित शर्माने आता मुंबई इंडियन्सच्या संघात जगातील सर्वात तुफानी फलंदाजाला एंट्री दिली आहे. सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सुरुवातीला सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात या तुफानी खेळाडूची एन्ट्री झाल्यामुळे संघ खूप आनंदी आहे. मुंबई इंडियन्सला हरलेले सामनेही स्वबळावर जिंकून देण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे, असे म्हटले जाते. आता हा खेळाडू नेमका कोण आहे याची सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबई इंडियन्सला बुधवारी संध्याकाळी पुण्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल सामना खेळायचा आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवणे हे मुंबई इंडियन्ससाठी मोठे आव्हान असेल, पण एक असा खेळाडू आहे जो रोहितच्या सेनेला स्वबळावर विजय मिळवून देऊ शकतो.
मुंबई इंडियन्सच्या संघात या खतरनाक खेळाडूच्या आगमनाने विरोधी स्पर्धक संघात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खेळाडू इतका जबरदस्त आहे की, विरोधी संघाचे गोलंदाज त्याच्या नावाने आता हादरले देखील असतील. हा तुफानी खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यकुमार यादव आहे.
या तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश झाला आहे. आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश होणे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 च्या मोसमात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवशिवाय खेळावे लागले. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या एन्ट्री मुळे संघाला आज नक्कीच फायदा होणार असे बोलले जात आहे.