Share

Kiran mane : २०२२ मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री; म्हणाला, तिथं भांडणार, वाद घालणार आणि…

२०२२ या वर्षात सगळ्यात वादग्रस्त राहिलेला मराठी अभिनेता म्हणजे किरण माने. किरण माने यांनी आता बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन ४ मधील सर्वात वादग्रस्त स्पर्धकांपैकी किरण माने एक असणार आहेत.

किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात सामील होताच फेसबुक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची ही फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडणार नाय! मानूस हाय मी, माणसासारखा वागणार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करणार. खेळ हाय त्यो.

तसेच म्हणाले, बिग बॉसच्या घरात मी हसनार, हसवनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर ‘दिल से’ करनार.. ती निभवनार..एखाद्याने पंगा घेतला तर त्याला जागा दाखवायला कमी नाय पडनार… गावाकडचा गडी हाय.

शेतकरी कुटूंबातला हाय. रानात फिरलेला, ढेकळं तुडवलेला. नदीत, विहिरीत पोहलेला. एका गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा जीवापाड प्रयत्न करावा लागनारंय दोस्तांनो, असे किरण माने म्हणाले. तसेच त्यांनी पुढे म्हटलं की, ‘शिवी’! ‘शिवी’ हा आमच्या बोलीतला अविभाज्य भाग हाय. त्या शिव्यांचा अर्थ नस्तो डोक्यात.

https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid02XV2Ug8Ley75xTFDRCT1K2AtSi3EcVgogdRX4aMqNSkEmHksXEstspPQ9XiaeCXxhl/

एक एक्सप्रेशन म्हनून शिवी बाहेर येती एवढंच. आवो आमी तर लै छोटी मान्सं, आमच्या पहाडासारख्या तुकोबारायाच्या अभंगातबी तुमाला शिव्या सापडत्याल. असे किरण माने म्हणाले. तसेच पुढे म्हणाले, निव्वळ मनातली भडास व्यक्त करन्याचं साधन म्हणून शिवी येती तोंडात.

पण त्याचा तिथं ‘इश्यू’ हुईल.. माझ्याविरुद्ध शस्त्र म्हनून वापर हुईल, हे म्हायतीय मला. कारन मी बी लै शिवराळ हाय. भांडताना मला त्या सवयीवर लगाम घालयाला लागनार.. ते करीन, बिग बॉसच्या घरात केवळ या शो च्या फाॅरमॅट’चं पालन करून खेळनारा एक खेळाडू असेन. खेळाडू, एक अभिनेता म्हनूनच माझ्याकडं बघा आनि शो चा आनंद घ्या, असे किरण माने म्हणाले.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now