Share

कर्मचाऱ्याने चार शब्दात संपवला विषय, म्हणाला, ‘मजा नहीं आ रहां’, राजीनामा पाहून बॉसही चक्रावला

काही जण पैशासाठी नोकरी करतात तर काही जण केवळ समाधानासाठी नोकरी करतात. बऱ्याच वेळा नोकरदारवर्ग कामाच्या ताणामुळे किंवा बॉसला कंटाळून नोकरी सोडल्याचे ऐकले असेल पहिले असेल .परंतु आपण कधी कामात मजा येत नाही म्हणून नोकरी सोडल्याचे ऐकले आहे का ? एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या कंपनीत मजा येत नाही म्हणून नोकरी सोडल्याची घटना घडली आहे.

प्रसिद्ध व्यावसायिक हर्ष गोयंका यांच्या कंपनीतल एका कर्मचाऱ्याने मजा येत नाही नोकरी सोडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. याबाबत हर्ष गोयंका यांनी कर्मचाऱ्याचा राजीनामा आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. ‘ मजा नही आ रहा ‘, अशा शब्दात त्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे.

या कर्मचाऱ्याने अवघ्या चार शब्दात राजीनामा दिला आहे. त्याचा राजीनामा पाहून थोडावेळ गोयंका हेदेखील विचारात पडले होते. हे पत्र जरी लहान असले तरी यामागचे कारण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे गोयंका म्हणाले आहे. त्यामुळे त्यांनी हे पत्र सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

राजेश असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने 18 जूनला पाच ओळींचे पत्र लिहून राजीनामा दिला आहे. सध्या हे पत्र सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून अनेक जण त्याच्या या पत्राचे स्वागत तर काही जण त्याला विरोध करत आहे.या पत्रावर अनेक मजेशीर कमेंट्स ही येत आहेत.

एखाद्या कंपनीत नोकरी करत असताना नोकरी सोडण्यापूर्वी राजीनामा द्यावाच लागतो.त्यासाठी कंपनीच्या बॉसला पत्र लिहावे लागते. प्रत्येक कंपनीत राजीनाम्याची पद्धत वेगळी असते. काही जण चार पाच ओळींमध्ये राजीनाम्याचे कारण स्पष्ट करतात तर काही जण राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत नाही.

परंतु या पट्ठ्याने केवळ चार शब्दात राजीनाम्याचे कारण स्पष्ट केल्याने त्याचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने केवळ 3 शब्दात राजीनामा देऊन त्याने नोकरी सोडली होते.त्याचाही राजीनामा सोशल मिडीयावर घालत होता.

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now