Share

politics : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी; ठाकरेंना शेवटची २१ तासांची मुदत, अन्यथा…

uddhav thackeray

politics : शिंदे- ठाकरे वाद टोकाला गेला असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यावं, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्या दाव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने उद्या दुपारी २ वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. त्यांना संबंधित कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.

शिंदे गटाने धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावरच दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ४ तारखेला मुदत वाढीचे पत्र पाठवले आहे. तसेच ठाकरे गटाला हवा असलेला शिंदे गटाचे वकील शाह यांच्या याचिकेचा तपशील देखील पाठवण्यात आला आहे, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. त्याची तातडीने दखल घेत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला देखील उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. आता ठाकरे गट या ठिकाणी कोणती कागदपत्रे सादर करते, काय काय पुरावे देते? हे पहावे लागेल.

निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करत धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला दिले जाते? अथवा निर्णय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाते का? या गोष्टीचा सस्पेन्स आता वाढला आहे. ठाकरे गटाने तर सर्व पुरावे गोळा करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी द्यावा, असे म्हटले होते. मात्र त्यांना उद्यापर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटाला आता उद्या दुपारपर्यंत पुरावे, कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर तब्बल ४० आमदारांना सोबत घेत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी पुढील निवडणुकीचा विचार करता थेट धनुष्यबाण चिन्हावरच आपला दावा सांगितला आहे. खरी शिवसेना आम्हीच आहोत, असे शिंदेंकडून सांगितले जात आहे. मात्र या दाव्याचा प्रखर विरोध उद्धव ठाकरे समर्थकांकडून होत आहे.

महाराष्ट्रातील या पेचाबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोग मात्र धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला देते? यावर पुढील अनेक राजकीय गणित अवलंबून आहेत. धनुष्यबाण हे चिन्ह जर निवडणूक आयोगाने गठित केलं. तर पुढे काय करायचं? याच्या पूर्व तयारीला दोन्हीही गट लागल्याची सूत्रांची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-
Team India: …तर संजू सॅमसनने नक्कीच मॅच जिंकून दिली असती, वाचा शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की काय घडलं?
Pune Police: ‘माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये मोदींची हत्या करण्याबाबत प्लॅन सुरू आहे’, एका कॉलने पुणे पोलीस हादरले
Amol Mitkari : “धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरेंचाच अधिकार होता, आहे आणि राहणार”; राज्यातील बड्या नेत्याने सांगीतले कारण

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now