pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले.
बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना खाली उतरायचे होते. पण बस ड्रायव्हरने बस न थांबवल्यामुळे त्याने मोठमोठ्याने बोंब मारायला सुरुवात केली. वाचवा… वाचवा रे.. वाचवा.. ड्रायव्हर मला किडनॅप करतोय, असा आरडाओरडा त्याने सुरू केला. हा प्रकार बघून इतर प्रवासी हैराण झाले.
जे सर्व पाहून रस्त्यावरून येणारे- जाणारे लोकही गाडी थांबवून हा सगळा प्रकार पाहत होते. हा माणूस मात्र ड्रायव्हरच्या नावाने टाहो फोडत होता. ओ मास्तर थांबवा ना..मला उतरू दया की.. असं बोलून शेवटी मला वाचवा.. याने मला ड्रायव्हरने किडनॅप केलंय, असंच काहीतरी बरळत होता. या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ बसमधल्या काही प्रवाशांनी काढला. तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
या व्हिडिओमध्ये एक माणूस वाचवा रे…वाचवा..वाचवा.. असा आरडाओरडा बस ड्रायव्हरच्या केबिनजवळ जाऊन करताना दिसत आहे. तसेच बसच्या बाहेर गाड्या थांबवून जी लोकं हा प्रकार पाहतायेत. त्यांना तो माणूस ‘मला ड्रायव्हरने किडनॅप केले. मला वाचवा, असं म्हणताना दिसत आहे.
हा सर्व प्रकार पुण्यातील चिंचवडपासून बालेवाडीकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसमध्ये घडला. बसमधील त्या प्रवाशाला आपला स्टॉप आला नसताना खाली उतरायचे होते. मात्र बस ड्रायव्हर बस थांबवत नसल्याने त्याने अजब शक्कल लढवत जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला.
बसमधील काही प्रवाशांनी या माणसाच्या विचित्र वागण्याचा दीड मिनिटाचा व्हिडिओच काढला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र आपला स्टॉप आलेला नसताना आरडाओरडा करणाऱ्या या पठ्ठ्याला नेटेकर्यांनी सोशल मीडियावर चांगलेच झापले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Shivsena : शिवसेना का सोडली? छगन भुजबळांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, त्यावेळी बाळासाहेबांनी…
BJP: शिंदे गटामुळे भाजपला पडणार खिंडार? सांगलीचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप विरोधातच करणार आंदोलनDevendra Fadanvis : राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही नक्कीच….