Share

सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार; किंमतीमधील वाढ पाहून डोळे पांढरे होतील

देशात महागाई वाढत चालली आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिस्थितीत आता सामान्य नागरिकांचे स्वतःचं घर घेण्याचे स्वप्न आधीपेक्षा महागणार असल्याचे चित्र आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. (The dream of buying a house will be broken)

एप्रिल ते जून या काळात देशातील ९ शहरांमध्ये घरांच्या किमतींमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३ शहरांचा देखील समावेश आहे. तब्बल १५ टक्क्यांनी किंमतीत सर्वाधिक वाढ चेन्नईमध्ये झाली, अशी माहिती प्रॉपइक्विटी संस्थेने दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे या घरांमध्ये घरांच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये घरांच्या किंमती प्रतिचौरसफूट १८,२५९ रुपयांवर गेल्या आहेत. ठाण्यामध्ये घरांच्या किंमती प्रतिचौरसफूट ६,३२५ रुपये झाली. पुण्यामध्ये प्रतिचौरसफूट ५,३४८ रुपयांवर घरांच्या किंमती जाऊन पोहचल्या आहे.

चेन्नईमध्ये घरांच्या किंमती प्रतिचौरसफूट ६,७४४ रुपयांवर जाऊन पोहोचल्या आहेत. मागील वर्षी हीच किंमत ५,८५५ रुपये प्रतिचौरसफूट इतकी होती. गुरुग्राममध्ये घरांच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेथे १०,३१५ रू. प्रतिचौरसफूट या दरांवरून ११,५१७ रू.प्रतिचौरसफूट एवढी वाढ किंमतीत झाली आहे.

हैद्राबादमध्ये देखील १२ टक्क्यांनी घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या ठिकाणी घरांच्या किंमती प्रतिचौरसफूट ६,४७२ रुपयांवर पोहचल्या आहेत. कोलकत्तामध्ये घरांच्या किंमतीत सर्वात कमी १ टक्के अशी वाढ दिसून येते.

९ शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रात प्रकल्प नोंदणी मागच्या वर्षभरात एकूण ५१ टक्क्यांनी वाढली आहे, असे सांगितले जाते. तसेच प्रॉपइक्विटी संस्थेचे संचालक समीर जाऊजा यांनी सांगितले की, मागच्या वर्षभरात घरांच्या किंमतीमध्ये अपेक्षित वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्या-
हाच तो महाराष्ट्र बाणा, हाच तो ठाकरी बाणा; कठीण परिस्थितीशी लढायला आनंद दिघेंचा पुतण्या ठाकरेंसोबत
‘महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही’
भयानक! पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार; तरुणावर ३५ वार, सिमेंटचा दगड डोक्यात घातला

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now