lift accident : मोठमोठ्या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा असते. लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी बघणे गरजेचे असते. मात्र लिफ्टमध्ये जर बिघाड झाला तर ते जीवावर बेतू शकते. याकडे लक्ष वेधणारी धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. ज्यामध्ये वीस वर्षीय तरुणाचा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
कुशाग्र मिश्रा नावाचा तरुण आपल्या मित्रांसोबत राजस्थानच्या जयपुरमधील हवेली अपार्टमेंटमध्ये राहायचा. रात्रीची वेळ असताना त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला गेला. मात्र त्याने पुढे न बघताच पाय आतमध्ये ठेवला. पण लिफ्ट आलीच नव्हती. आणि तो लिफ्ट शाफ्टमध्ये खाली पडला.
लिफ्टच्या शाफ्टमध्ये अकराव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. व त्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.
या दुर्दैवी घटनेमध्ये २० वर्षीय तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे लक्ष नसल्याने त्याने लिफ्टच्या आतमध्ये पाऊल ठेवले. आणि तो लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडला. या घटनेनंतर रहिवाशांकडून लिफ्टची व्यवस्था करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जातोय
तरुणाचे लक्ष नव्हते हे जरी असले तरी मुळात लिफ्ट वर आली नसताना दरवाजा उघडतोच कसा? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. लिफ्टमध्ये जरूर तांत्रिक बिघाड असावा. त्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला, अशी चर्चा देखील तेथील परिसरात होत आहे.
अशाच प्रकारच्या अनेक घटना मागील काळात देखील समोर आल्याचे आढळून येते. पाली येथे अशाच प्रकारे लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे एका सेल्समनला आपल्या प्राण जीव गमवावा लागला होता. जुन्या इमारतींमध्ये, लहान लहान इमारतींमध्ये पैसे कमी खर्च व्हावेत म्हणून जुन्यात लिफ्ट बसवण्याचा प्रकार केला जातो. पैसे वाचवण्याच्या नादात अशा प्रकारचे अपघात त्यामुळे घडण्याची शक्यता अधिक असते.
महत्वाच्या बातम्या-
Tuljapur : धक्कादायक! तुळजापूरला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जण जागीच ठार
devendra fadnavis : ‘दसरा मेळाव्यात कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा…,’ फडणवीस स्पष्टच बोलले
cricket : लाहोरचं जेवण चांगलं होतं पण कराचीमध्ये.., मोईन अलीने सगळ्यांसमोर काढली पाकिस्तानची लाज