Share

Wedding Card: डॉक्टर जोडप्याने चक्क औषधाच्या पाकीटाप्रमाणे छापली लग्नपत्रिका, फोटो पाहून नेटकरी हैराण

wedding card

Wedding Card: तामिळनाडूच्या तिरूवन्नमलाई जिल्ह्यातल्या वैद्यकीय व्यवसायातील जोडप्याने आपल्या लग्नाची पत्रिका हटके पद्धतीने छापली आहे. त्यांनी औषधी गोळ्यांच्या कव्हरप्रमाणे पत्रिकेची डिझाईन बनवली आहे. लग्नात प्रत्येक काम सर्जनशीलतेने केले जाते. प्रत्येक कामाप्रमाणे या लग्नात पत्रिकाही हटके पद्धतीने डिझाईन केली आहे. ही पत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

लग्न म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. त्यामुळे लग्नात कशाचीही कमी होऊ नये असा प्रयत्न केला जातो. ते वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे मार्गही अवलंबतात. तामिळनाडूच्या तिरूवन्नमलाई जिल्ह्यातील हे कपल वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. पत्रिकेमध्ये वधु वराचे प्रोफेशन नमूद केलेले आपण बघत असतो, मात्र या कपलने पत्रिकेतूनच आपले प्रोफेशन सगळ्यांना माहित करून दिले.

एझहिलारसान आणि वसंथकुमारी हे वधू वराचे नाव आहे. एझहिलारसान हा तिरूवन्नमल जिल्हातील आहे. वसंथकुमारी ही विल्लूपूरम जिल्ह्यातल्या गेंजी येथील आहे. पत्रिकेत त्यांची नावे बोल्ड असून सर्व माहिताचा टाईप, फॉरमॅट हे औषधाच्या गोळ्यांच्या कव्हर सारखे आहे. यांची सर्जनशीलता पाहून सर्वत्र यांचे कौतुक केले जात आहे.

सद्यस्थितीमध्ये लग्नाच्या पत्रिका अनोख्या सर्जनशीलतेने तयार करण्याचा ट्रेंड चालू आहे. वेगवेगळ्या थीम नुसार लग्न पत्रिका छापतात. अशाच काही मनोरंजक लग्नपत्रिका सोशल मीडियावर अनेकदा दिसतात. त्याचे उदाहरण म्हणजे मदुराईतील एका जोडप्याची लग्नपत्रिका ज्यावर त्यांनी QR कोड छापला होता, ते व्हायरल झाले होते.

गुवाहाटी, आसाम येथील या जोडप्याने त्यांच्या खास दिवसासाठी संविधान-थीम असलेली लग्नपत्रिका छापली होती. कार्डमध्ये समानता दर्शवण्यासाठी वधू आणि वरांची नावे न्यायाच्या तराजूच्या दोन्ही बाजूला लिहिली होती. अशाच काही मनोरंजक लग्नपत्रिका सोशल मीडियावर अनेकदा दिसतात.

महत्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्री साहेबांना व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधांत कोणता विकास साध्य करायचाय?’
आम्ही गद्दार नाही, आमच्या बापानं शिवसेना उभी केलीये; भावना गवळींनी थेट उद्धव ठाकरेंनाच दिले चॅलेंज
old actresses : चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं पण खऱ्या प्रेमानं कायम छळलं; जुन्या अभिनेत्रींची अवस्था वाचून रडू येईल
राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून सतत व्हेंटिलेटरवर; कुटुंबाने घेतला मोठा निर्णय    

तुमची गोष्ट इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now