Bollywood: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सावन कुमार आजारी असल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सावन कुमार यांना फुफुसाचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीतून समोर येत आहे. सावन कुमार यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण बॉलीवूडमधून अनेक दिग्गज कलाकार, निर्माते यांनी शोक व्यक्त केला. सावन कुमार यांनी संजीव कुमारपासून सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.
“सनम बेवफा” हा सर्वांच्या लक्षात राहणारा चित्रपटाचा सावन कुमार टाक यांनीच दिग्दर्शित केला होता. सावन कुमार टाक यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हंटले की, ‘त्यांना काही दिवसांपासून अशक्तपणा होता, ताप पण होता.’
‘आम्हाला वाटले की, त्यांना न्युमोनिया झाला. मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना फुफुसाचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे अनेक अवयव देखील निकामी झाले होते, अशा प्रकारची माहिती सावन कुमार यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिली.
संजीव कुमार यांना घेऊन सावन कुमार यांनी आपला पहिला चित्रपट ‘नैनीताल’ची निर्मिती केली. त्यानंतर सौतन, साजन बिना सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केले. ऋतिक रोशनच्या पहिल्याच “कोई मिल गया..” या चित्रपटातील गीते लिहिण्याचे श्रेय सावन कुमार टाक यांना दिले जाते.
सावन कुमार टाक यांच्या निधनानंतर सुपरस्टार सलमान खानने दुःख व्यक्त केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो म्हणाला, ‘तुमच्या आत्म्यास शांती लाभो माझे प्रिय सावनजी.. मी कायम तुमच्यावर प्रेम केले. तुमचा आदर केला आहे.’ सावन कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत त्यांच्या अंत्यसंस्कार केले जाणार होते.
महत्वाच्या बातम्या-
Waheeda Rehman: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार वहिदा रेहमानच्या प्रेमात झाला होता वेडा, कुटुंब अन् करिअरही लावले पणाला
Eknath Shinde : शिंदे सरकार अडचणीत सापडणार? माहिती अधिकारामार्फत धक्कादायक माहिती आली समोर
Zeenat Aman: ‘या’ अभिनेत्याने भर पार्टीत फोडला होता झीनत अमानचा एक डोळा, वाचा तो वेदनादायक किस्सा