आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट कमाईच्या बाबतीत पिछाडीवर पडले. याआधीही अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता मात्र तोही बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही.
बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांच्या या बिघडलेल्या स्थितीवर आता ‘भूल भुलिया 2’चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांची प्रतिक्रिया आली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनीस बज्मी यांनी हिंदी चित्रपटांच्या या स्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
तसेच चित्रपटसृष्टीला सल्ला देताना अनीस बज्मी म्हणाले, चांगल्या क्वालिटीचे चित्रपट बनवायला हवे आणि ते कसे बनवायचे आधी ते शिकायला हवे. 5-10 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना जे आवडत होते ते आता आवडत नाही. कारण आता प्रेक्षक जगभरातील चित्रपट पाहू शकतात. महामारीच्या काळात घरी बसून पाहता येत होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला त्यांनी घर सोडावे आणि चित्रपटाची तिकिटे घ्यावीत असे वाटत असेल, तर त्यासाठी काहीतरी चांगले देणे गरजेचे आहे.
बॉलीवूड आणि टॉलिवूडमधील वादाबद्दल अनीस बज्मी म्हणाले, मला यात काहीही अर्थ वाटत नाही. दोन्ही फिल्म इंडस्ट्री अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि चांगले चित्रपट बनवत आहेत. हिंदी चित्रपटांचे रिमेक साऊथमध्ये होत असतात आणि साऊथ चित्रपटांचे बॉलिवूडमध्येही रिमेक पाहायला मिळतात.
जर तुम्ही 3 हिट चित्रपट आणि 14 फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलत असाल तर ते निराधार आहे. कारण भारतात दरवर्षी सुमारे 200 चित्रपट बनतात त्यापैकी फक्त 5-7 चित्रपट हिट होतात. तर यावेळी ते 3 चित्रपट साऊथचे आहेत, ते चांगले चित्रपट होते आणि आमचे चित्रपट चालले नाहीत. बस एवढेच
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने 181 कोटींहून अधिक कमाई केली होती.
महत्वाच्या बातम्या-
Kaushik lm : चित्रपटसृष्टीवर शोककळा! विजय देवरकोंडा, धनुष, सलमानने जवळचा मित्र गमावला
Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण या कारणामुळे झाला बॅन
करीना कपूरने लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसमोर जोडले हात; म्हणाली, कृपा करून
Boycott: एकीकडं प्रमोशन तर दुसरीकडे आपल्याच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची केली मागणी