Shah Rukh Khan, Rahul Dholakia, Akshay Kumar, Ranveer Singh/ असं म्हणतात की कोणाचाही घमंड कायम राहत नाही. बॉलीवूड सध्या मोठ्या संकटातून जात असून प्रेक्षक त्यापासून अंतर राखत आहेत. आधी अक्षय कुमार आणि रणवीर सिंगचे चित्रपट, त्यानंतर रणबीर कपूरच्या चार वर्षांच्या पुनरागमनानंतरही शमशेरा फ्लॉप झाला आणि आता शेवटी आमिर खानचा लाल सिंग चड्ढा एका लाँग वीकेंडमध्ये ५० कोटींचा आकडाही गाठू शकला नाही. याचे कारण म्हणजे बॉलीवूडमध्ये तीव्र निराशा आहे.
हे होण्यामागच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे बॉलीवूड स्टार्स खूप घमंडी (गर्विष्ठ) झाले होते आणि ते स्वतःला देवापेक्षा कमी समजत नव्हते. अशा स्थितीत जनता त्यांना धडा शिकवत आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वजण हे मान्य करत नसले तरी हळूहळू अहंकाराच्या मुद्द्यावर विचारमंथन सुरू झाल्याचे दिसते. भविष्यात कदाचित ते उघडपणे स्वीकारले जाईल.
शाहरुख खानसारख्या सुपरस्टारला घेऊन ‘रईस’ हा चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक राहुल ढोलकियापासून त्याची सुरुवात झाली आहे. ढोलकिया यांनी आज ट्विटरवर लिहिले की, अशा पाच गोष्टी आहेत, ज्यावर बॉलीवूडने लक्ष दिल्यास आणि सुधारणा केल्यास परिस्थिती बदलू शकते. राहुलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, माझ्याकडे चित्रपटसृष्टीसाठी पाच सल्ले आहेत.
त्याने दिलेल्या सल्ल्यामध्ये हे समाविष्ट आहे:
1. चांगले चित्रपट बनवा.
2. चित्रपट निर्मितीचा खर्च कमी करा.
3. चित्रपटांचे तिकीट दर खूप कमी करणे आवश्यक आहे.
4. किमान तीन महिने OTT वर चित्रपट प्रदर्शित करू नका.
5. गर्विष्ठ होऊ नका. सर्वांना सोबत घेऊन जा.
यानंतर त्याने लिहिले की कदाचित या गोष्टी बॉलिवूडला काही मदत करू शकतात.
My 2 cents on what needs to be done by our fraternity:
1. Make better films.
2. Reduce COP
3. Reduce ticket prices drastically
4. Not release films on OTT for 3 month
5. Stop being Arrogant. be inclusiveMaybe this will help?
— rahul dholakia (@rahuldholakia) August 18, 2022
राहुल ढोलिकियाच्या या चर्चेवर सध्या तरी बॉलिवूडमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ट्विटरवर सर्वसामान्यांनी ढोलकिया यांच्या शब्दांचे स्वागत केले आहे. अनेकांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीतील कोणीतरी पहिल्यांदाच प्रामाणिकपणे सत्य स्वीकारत आहे. चित्रपट फ्लॉप ठरल्याबद्दल बॉयकॉट बॉलीवूड मोहिमेला दोष देत नाही.
या गोष्टींमध्ये आणखी एक म्हणजे बॉलीवूडला सनातन संस्कृती आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवणे बंद करावे लागेल, असेही अनेकांनी सांगितले आहे. बॉलीवूडने आता चित्रपटांचे रिमेक आणि कॉपी करणे थांबवावे आणि मूळ कल्पनांवर काम करून चित्रपट बनवावेत, असेही काहींनी म्हटले आहे. बॉलीवूडवाल्यांनाही घराणेशाही थांबवावी लागेल, असेही अनेकांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Shahrukh Khan : मुलासोबत तिरंगा फडकावणे शाहरुखला पडले महागात, नेटकरी म्हणाले, आर्यनला ड्रग्स घेऊन..
Shahrukh khan: ज्या मराठी अभिनेत्याला शाहरुखच्या वॉचमननं दारातही उभं केलं नव्हतं, आता तोच करतोय किंग खानसोबत काम
जेव्हा शाहरुखने थेट दिग्दर्शकाला दिली होती कानाखाली, तेव्हा संजुबाबाने त्याचा राग केला होता शांत
शाहरुखलाही भेटलो होतो पण, ६ वेळा रणजी चॅम्पियन कोचने सांगितले IPL जॉईन न करण्याचे कारण