टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आज ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे झाला. क्रिकेट विश्वात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहितने वनडेमध्ये ३ वेळा द्विशतक केले आहे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या देखील त्याच्या नावावर आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी…
रोहित’चे बालपण
रोहितचे बालपण फार गरीबीमध्ये गेले. त्याचे वडील गुरुनाथ शर्मा एका ट्रॅव्हल कंपनीत काम करत होते आणि त्यांचे उत्पन्न फार जास्त नव्हते. त्यामुळे रोहित मुंबईतील उपनगर बोरिवलीत त्याच्या काका-काकींकडे होता. १९९९ साली रोहितने काकांच्या सल्ल्याने एका क्रिकेट कॅम्पमध्ये खेळण्यास सुरूवात केली.
तेव्हा रोहितचे कोच दिनेश लाड यांनी त्याची फलंदाजी बहरात जावी म्हणुन त्याची शाळा बदलून स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत जाण्याचा सल्ला दिला. लाड तेव्हा त्या शाळेत कोच होते. जेणेकरून रोहितला क्रिकेट खेळण्यासाठी अधिक सुविधा मिळतील. परंतु त्यावेळी रोहितची घरची परिस्थीती अत्यंत हालाकीची होती. अशा वेळी दिनेश लाड यांनी त्याला स्कॉलरशिप मिळवून दिली, जेणेकरून त्याला एक रुपयाही ना घालवता तब्बल ४ वर्ष स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये शिकता आले.
रोहित शर्माच्या क्रिकेट करिअरला याच ठिकाणाहून यशाचे पंख प्राप्त झाले . खरंतर त्यावेळी रोहित ऑफस्पिनर गोलंदाज म्हणून खेळत होता . पण दिनेश लाड यांना रोहितच्या फलंदाजीत एक वेगळीच चमक दिसली होती आणि त्यांनीच रोहितला थेट ओपनिंग करायला सांगितलं होतं. रोहितच्या करिअरनं इथूनच टॉप गिअर पडकला आणि मग त्यानं मागं वळून पाहिलंच नाही . अवघ्या १७ वर्षांचा असताना रोहित मुंबईच्या संघासाठी खेळू लागला . रोहितच भाग्य तर तेव्हा उजळला जेव्हा महेंद्रसिंग धोनी’ने त्याला भारतीय संघात ओपनिंग करायला संधी दिली.
रोहित शर्मा सध्या क्रिकेट करिअरच्या शिखरावर असून भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघांचा तो कर्णधार आहे . आता रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसीची ट्रॉफी भारतीय संघानं जिंकावी अशी उत्सुकता सर्वांना आहे . भारतीय संघाचा ‘ हिटमॅन ‘ रोहित शर्माला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
कर्णधार रोहित शर्माची कमगिरी
कर्णधार म्हणून रोहितने ४३ सामन्यात देशाचे नेतृत्व केले आहे. यापैकी ३७ सामन्यात विजय तर ६ मध्ये भारताचा पराभव झालाय. आयपीएलमध्ये रोहितने ५६.२० टक्के सामने जिंकले आहेत. रोहित हा एकमेव कर्णधार आहे ज्याने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून रोहितने एकही मॅच गमावली नाही. त्याने सलग १४ सामने जिंकले आहेत. या वर्षी भारत ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप खेळणार असून रोहितकडून सर्वांना मोठी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंबईकडे सचिन-जहीरसह १८ सपोर्टिंग स्टाफची फौज असताना पराभवासाठी रोहित का जबाबदार?
MI Vs LSG: सलग सात सामने हरल्यानंतर मुंबईच्या संघात रोहितने केले ‘हे’ मोठे बदल; अशी असेल प्लेईंग ११
IPL 2022: सलग ८ पराभवानंतर संघात होणार अर्जुन तेंडुलकरची एन्ट्री, मुंबई इंडियन्सने दिले संकेत
मनसेने आखला मोठा प्लॅन, कार्यकर्त्यांसाठी उभी केली तब्बल २ हजार वकिलांची फौज