Share

Tea Stall: ‘या’ चहावाल्याची डोकॅलिटी पाहून ग्राहक पडले बुचकळ्यात, पैसे देण्यापुर्वी करतात १० वेळा विचार

Tea Stall, Frustrated Dropout, Shubham Saini/ भारताची स्टार्टअप राजधानी बेंगळुरूमधील एका चहाच्या स्टॉलने बिटकॉइनला पेमेंटचा एक प्रकार स्वीकारण्याच्या कल्पनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एवढेच नाही तर या दुकानाचे नाव जाणून तुम्ही जरा विचारात पडाल. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, काही लोकांना थोडासा वैताग आला की चहा प्यायला आवडतो. याचा वापर करून एका व्यक्तीने आपल्या दुकानाचे नाव ‘फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट’ ठेवले आहे आणि लोकांना त्याच्याकडे आकर्षित करत आहे.

एवढेच नाही तर त्याने आपल्या दुकानात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने पैसे भरण्याची सुविधा दिली आहे. ‘फ्रस्ट्रेटेड ड्रॉपआउट’ टी स्टॉल शुभम सैनी यांच्या मालकीचा आहे, ज्यांनी बीसीए अभ्यासक्रम सोडल्यानंतर हे स्टार्टअप सुरू केले. ट्विटरवर शेअर केलेल्या छायाचित्रात एक व्यक्ती टेबलावर मॅगी आणि पास्ताच्या पॅकेट असलेल्या टेबलवर चहा बनवताना दिसत आहे.

पार्श्‍वभूमीवर बॅनरवर लिहिले आहे, ‘चल चाय पीते हैं.’ शुभम त्याच्या दुकानात तंदुरी चहाही बनवतो. शुभमची ही कल्पना लोकांना खूप आवडली आणि आता या युक्त्या पाहून लोक खूप प्रभावित झाले आहेत. आपल्या जाहिरातीत त्यांनी लिहिले होते की, ‘आम्ही तुमचा चहा मातीच्या भांड्यात बनवतो आणि मातीच्या भांड्यात सर्व्ह करतो.’

तुम्ही चित्रात पाहू शकता की, छोट्या दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला आहे, ‘येथे क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाते.’ या दुकानात एका कप चहाची किंमत 20 रुपये आहे. ग्राहक UPI द्वारे देखील पैसे देऊ शकतात. शुभम सैनी म्हणाले, “मी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि काही महिन्यांतच माझ्या पोर्टफोलिओमध्ये 1,000 टक्क्यांनी वाढ झाली.

https://twitter.com/akshaymarch7/status/1575043889144430592?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1575043889144430592%7Ctwgr%5Eb553fea452db758b1ece42461a44d1d659821438%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Foff-beat%2Fchaiwala-tea-seller-clever-trick-works-on-customer-for-paying-the-money%2F1374009

शुभम सैनी पुढे म्हणाला लवकरच, माझे क्रिप्टो वॉलेटचे 30 लाख झाले आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा शुभमला वाटले की तो क्रिप्टो जगाचा पुढचा राकेश झुनझुनवाला आहे, तेव्हा 2019 मध्ये क्रिप्टो मार्केट क्रॅश झाल्यामुळे परिस्थिती आणखी वाईट झाली.

शुभम पुढे म्हणाला, ‘मी जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलो होतो, थेट 30 लाखांवरून ते  1 लाखावर. एक रात्र माझ्या आयुष्यात इतकं बदलू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. सोशल मीडियावर शुभम सैनीमुळे लोक प्रभावित झाले. एका व्यक्तीने विचारले, ‘तो क्रिप्टो कसा स्वीकारतो? सर्व नाणी स्वीकारली जातात का? तो विनिमय दर कसा ठरवतो? मला अनेक प्रश्न आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मदरसांमध्ये असं काय शिकवलं जातं की ज्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे? आरिफ मोहम्मद यांनी केला मोठा खुलासा
उदय सामंत टक्केवारी घेऊन काम करतात, राणे समर्थकांना पोसतात, राऊतांचा गंभीर आरोप
कोरोनामुळे नोकरी गेली, ३ इंजिनीअर मित्रांनी सुरू केला चहाचा स्टॉल, आतात करतात बक्कळ कमाई

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now