ED : अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर धाड पाडत कारवाया करणाऱ्या ईडीला कोर्टाने नोटीस पाठवली आहे. अर्जदाराने एका भाजप आमदाराच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने कोर्टाने ईडीला नोटीस पाठवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी काही दिवसांपूर्वी ईडीकडे एक अर्ज केला होता. यात पुण्यातील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यांचे पुतणे भाजपचे आमदार रमेश कराड व कुटुंबातील अन्य पाच जणांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु, ईडीने त्यांच्या अर्जाची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
सक्तवसुली संचालनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात विनायक श्रीपती कराड यांनी अर्ज सादर केला होता. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, त्यांचे पुतणे आमदार रमेश कराड, राजेश काशीराम कराड, काशीराम दादाराव कराड आणि तुळशीराम दादाराव कराड यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी हा अर्ज सादर करण्यात आला होता.
मात्र, ईडीने त्यांच्या अर्जाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी खंडपीठाकडे धाव घेतली. खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी याप्रकरणी ईडीला नोटीस बजावली आहे. २० सप्टेंबर २०२२ रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
तसेच पुढील सुनावणीपर्यंत खंडपीठाने कराड कुटुंबियांच्या बेहिशोबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विनायक श्रीपती कराड यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार याचिकाकर्ता हा शेतकरी आहे. तसेच त्यांनी कराड कुटुंबीयांच्या विरोधात अनेक तक्रारीही केल्या आहेत.
या याचिकेत फक्त ते भाजपचे आमदार असल्याने ईडीकडून चौकशी केली जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. यावर ईडीला कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
सत्ताधारी असून पायरीवर बसवलय वाघाने, ३२ वर्षांच्या पोराने तुम्हाला घोडे लावलेत
तारक मेहता..च्या बबिताजींनी बनारसी साडी आणि केसात गजरा लावून घातला धुमाकूळ, चाहते झाले वेडे, पहा फोटो
नेहमी शांत संयमी असणारे नितीन गडकरी का संतापले? म्हणाले त्यांना मी सोडणार नाही…
नितीन गडकरींची भाजपच्या संसदीय मंडळातून हकालपट्टी का झाली? वाचा इनसाईड स्टोरी