Share

एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का! शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांना फोडले, भाजपात प्रवेश

महाराष्ट्रात बंडाचं वावटळ उठलं आहे. एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिंदेंनी बंडाचे हत्यार उगारत भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. परंतु त्याच भाजपने आता एकनाथ शिंदे यांनाच मोठा धक्का दिला आहे. (The corporators who went with Shinde were smashed, they joined the BJP)

शिंदे समर्थक असणाऱ्या तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामागे भाजपचे गणेश नाईक असल्याचे म्हंटले जाते. अशाप्रकारे शिंदे गटाला खिंडार पाडण्याचे काम भाजपकडून रीतसर होताना दिसत आहे.

हे तीन नगरसेवक माविआ सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपातून शिवसेनेत दाखल झाले होते. आता ते पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नवीन गवते, अपर्णा गवते दीपा गवते अशी या तीन माजी नगरसेवकांची नावे आहे. अशाप्रकारे शिवसेनेच्या शिंदे गटातील नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे.

दिघा भागात मोठे नाव आणि वचक असणारा गवते परिवार आता भाजपसोबत गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील या तीन माजी नगरसेवकांचे भाजप प्रवेश करणे या गोष्टीला सध्या शिवसेनेत आणि एकनाथ शिंदे गटात चाललेला गोंधळ देखील जबाबदार असल्याचे बोलले जाते.

ऐतिहासिक बंड घडवून एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ देत युतीचे सरकार महाराष्ट्रात आणले. परंतु भाजपकडून पडद्यामागून शिंदे गटाला फोडण्याचे प्रयत्न अशाप्रकारे झाले तर मात्र भविष्यात पुन्हा नवे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता करता येत नाही.

महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही संकटांचा सामना करत असताना तुम्हाला आता आमची आठवण आली का’? गावकऱ्यांनी आमदाराला खडसावले
आम्ही ठाकरे आहोत, कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा आमचा पिंड आहे; ठाकरेंनी ठणकावले
झटपट काम आईच्या हातांना आराम! 14 वर्षीय चिमुकलीने आईसाठी बनवलं 8 कामं करणारं मशीन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now