अभिनेत्री राधिका मदनने अलीकडेच एक खुलासा केला आहे. त्यात तिने सांगितले आहे की, प्रत्येकाला असे वाटते की मी ज्या पहिल्या चित्रपटासाठी शूटिंग केले. तो चित्रपट ‘पटाखा’ होता, पण प्रत्यक्षात तो चित्रपट ‘मर्द को दर्द नहीं होता’ हा होता.(The contraceptive pill had to be taken on the first day of shooting,)
मी साजिद अलीच्या लैला मजनूच्या ऑडिशनला गेले होते, तिथे कोणीतरी मला विचारले, “अॅक्शन आता है?” तेव्हा मी त्यांना सांगितले की मी व्यावसायिक नृत्य केले आहे. तेव्हा त्यांनी मला एका खोलीत नेले आणि मला काही अॅक्शन करायला लावल्या. साजिद सरांना भेटण्यापूर्वी मी वासन सरांना भेटले. त्यांनी मला साइन केले. एवढेच नाही तर राधिका म्हणते की, मला अॅक्शन जमत नव्हती. त्यामुळे मी रोज अॅक्शन शैलीतील चित्रपट पाहून माझी तयारी केली. मी दर 10-15 मिनिटांनी ब्रेक घेतला, पण किमान एक महिन्यासाठी दिवसातून दोन चित्रपट पाहण्यास स्वत:ला भाग पाडले.
त्यानंतर मी मार्शल आर्टचे प्रशिक्षण सुरु केले. जे १० महिने ४ ते ५ तास चालत होते. त्यानंतर मी या प्रोसेसच्या प्रेमात पडले. असे तीचे म्हणणे आहे. ती म्हणते की, माझ्या या प्रशिक्षणातून मला मार्शल आर्टिस्टबद्दल खूप काही शिकायला मिळाले. मला त्यांच्याप्रमाणे शिस्तबद्ध बनवण्यासाठी माझा प्रशिक्षक मला त्यांच्या जीवनशैलीबद्दल सांगायचा.
अभिमन्यू दास, माझा सहकलाकार आणि मी एकत्र प्रशिक्षण घ्यायचो. तो भाग्यश्री मॅडमचा मुलगा आहे हे मला माहीत नव्हते. जेव्हा मी वाचन सेशनसाठी त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी माझी कार असताना तो ऑटोरिक्षातून प्रवास करायचा. मला वाईट वाटायचे आणि मी त्याला मग राईड ऑफर करायचे. मी त्याला कधी-कधी चेष्टेत मारलेही, पण तो नेहमीच गोड असायचा.
ती हेही म्हणते की, माझा सेटवरचा पहिला दिवस हा अनपेक्षित होता. मला टीव्हीच्या सेटची सवय झाली होती. पण चित्रपट सेटवर अतिशय शांतता होती. मी प्रोडक्शन टीमला विचारलं की आम्ही त्या दिवशी शूटिंग करत होतो की नाही, तेव्हा त्यांनी मला सांगितले की सीन तयार असेन तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल. टीव्हीवर लोक मला १५ मिनिटांत तयार व्हा, अशी मागणी करायचे त्यामुळे मी घाबरले होते. मला दिवसाला सात-आठ सीन करायची सवय होती. येथे, फक्त एक शॉटचा शेड्यूल होता.
माझ्या पहिल्या शॉटमध्ये मला गर्भधारणेची गोळी विकत घ्यायला लावली. शूटच्या ठिकाणी माझे पालक मला सरप्राईज करण्यासाठी दिल्लीहून आले होते. जेव्हा लोकांनी त्यांना शूटबद्दल विचारले तेव्हा ते काय सांगतील या विचाराने माझे वडील अस्वस्थ झाले. जेव्हा मी माझा पहिला शॉट पूर्ण केला तेव्हा आजूबाजूला पाने आणि फुले पडण्याची आणि लोक टाळ्या वाजवताना मी कल्पना केली होती. परंतु ते तसे नव्हते. अवघ्या दोन-तीन मिनीटांत ते संपले. त्यानंतर, माझ्या पालकांनी मला या आनंदात डिनरसाठी बाहेर नेले जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
महत्वाच्या बातम्या
कोरोनानंतर जगावर येणार ‘हे’ मोठे संकट; एका कीडा करणार संपूर्ण पृथ्वी नष्ट
‘व्हेलेंटाईन डे’ ला सलमान खानसोबत असणार कतरिना, विकी कौशलपासून राहणार दूर