Share

सरकार पडले, ते बरे झाले, अडीच वर्ष फक्त पैसे खात होते; काँग्रेस कार्यकारिणीत नेत्याची खदखद

congress

राज्याच्या राजकारणात अनेक दावे – प्रतिदावे करण्यात येत आहे. सत्तेतून ठाकरे सरकार पायउतार झाल्यापासून सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. विरोधकांच्या गोटात बैठकांचे सत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे.

आज मुंबईत नुकतीच प्रदेश कार्यकारणीच्या बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसच्या काही सदस्यांनी खळबळजनक व्यक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. माविआ सरकार पडले, ते बरे झाले. सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसेच खात होते, असं म्हणत पक्षश्रेष्ठींची झोप उडवली आहे.

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसच्या कार्यकारिणीतील एका नेत्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले हे बरे झाले. गेली अडीच वर्ष फक्त पैसे खाणे सुरू होते, असे खळबळजनक वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्याची माहिती मिळत आहे.

वाचा नेमकं झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे, या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आशीष दुआ, सोनल पटेल यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते.

याच बैठकीत हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पदाधिकाऱ्याने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आपलं मत व्यक्त करताना म्हंटलं आहे की, पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते, असा खळबळ दावा या पदाधिकाऱ्याने केला आहे.

‘एखादा कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे, अशी खदखद एका पदाधिकाऱ्याने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलून दाखवली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येई
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now