ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या घोषणेवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहते रवी बिश्नोईला स्टँडबाय ठेवण्याबाबत प्रश्न विचारत आहेत, तर काही जण मोहम्मद शमीला 15 सदस्यीय संघात स्थान न दिल्याबद्दल प्रश्न करत आहेत.(the-congress-leader-raised-questions-on-the-selection-of-team-india)
दरम्यान, काँग्रेस नेते आणि किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभेचे माजी आमदार तौसीफ आलम यांनी संघ निवडीला वेगळाच अँगल दिला आहे. तौसीफ आलमने फेसबुकवर पोस्ट लिहून संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तौसीफ आलमने लिहिले की, जोपर्यंत भारतीय संघात योग्य निवड होत नाही तोपर्यंत मी क्रिकेट पाहणार नाही. टीम इंडियाची सोमवारी T20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली. निवडकर्त्यांच्या निर्णयाने मला धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, सिराज, खलील अहमद यांसारख्या खेळाडूंना बाहेर ठेवणे आश्चर्यकारक होते.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल(Harshal Patel) हे दुखापतीमधून बरे झाल्यानंतर 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात परतले आहेत. या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
बुमराहच्या(Jasprit Bhumrah) पाठीला दुखापत झाली होती तर हर्षलला स्नायूंचा ताण होता. दोघांचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ‘रिहॅबिलिटेशन’ झाले आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांना तंदुरुस्त घोषित केले. आवेश खान आणि रवी बिश्नोई मात्र 15 जणांच्या विश्वचषक संघात स्थान मिळवू शकले नाहीत. बिश्नोईपेक्षा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला प्राधान्य देण्यात आले.
हर्षलचे संघात पुनरागमन केल्यानंतर, आवेशला जागा नाही. शेवटच्या षटकांमध्ये आवेश चांगलाच महागात पडला. यादरम्यान, त्याने 18 धावा प्रति षटक (शेवटच्या षटकांमध्ये) या दराने धावा स्वीकारल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (जर त्यांनी पात्रता जिंकली तर) संघ असतील. या सर्व संघातील डावखुरे फलंदाज पाहता अश्विनची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मात्र टी-20 संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.
ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.