Share

आता मध्यरात्रीचे धावणे बंद, आईच्या उपचारासाठी आणि सैन्य भरतीसाठी ‘या’ कंपनीने प्रदीपला केली मदत

मध्यंतरी सैन्यात भरती होण्यासाठी रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्तावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून प्रदीपची आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्याला सैन्यात भरती होता येत नसल्याचे समोर आले होते. तसेच त्याची आई आजारी असल्याचे देखील प्रदीपने व्हिडीओत सांगितले होते.

प्रदीपचा हा व्डिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. आता रिटेल क्षेत्रातील कंपनी शॉपर्स स्टॉपने देखील प्रदीपला मोठी मदत केली आहे. शॉपर्स स्टॉपने प्रदीपला आईच्या उपचारांसाठी अडीज लाखांचा चेक दिला आहे. याबाबतची माहिती चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी दिली आहे.

या मदतीमुळे प्रदीपचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच त्याला या पैशातून प्रशिक्षण घेता येणार आहे. या मदतीमुळे प्रदीपला चांगलाच दिलासा मिळाला आहे. यापूर्वी रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ, महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकजण प्रदीपला मदत करण्यासाठी पुढे आले होते.

सर्वात प्रथम चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी नोएडाच्या रस्तावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते या तरुणाला लिफ्ट देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या तरुणाने त्यांना नकार दिला. यानंतर तरुणाची चौकशी करण्यात आल्यावर समजले की, तो नोएडा सेक्टर-१६ मध्ये असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये काम करतो आहे. त्याला सैन्यात भरती व्हायचे आहे.

नोकरीमुळे त्याला धावायला आणि सराव करायला वेळ मिळत नसल्यामुळे तो घरापर्यंत धावून त्याची भरपाई करतो. तरुणाने यावेळी सांगितले की, नोएडा सेक्टर-१६ पासून त्याचे घर १० किमी दूर आहे आणि तो दररोज अशा प्रकारे घरी जातो. त्यामुळे त्याचा सरावही होतो आणि वेळेची कमतरताही दूर होते. माझ्या आईचे उपचार सुरु असल्यामुळे माझ्यावर काम करावे लागत आहे.

विनोद कापरी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तरुणाचे सर्वजन कौतुक करत होते. तसेच अनेकांनी तरुणाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडीओ शॉपर्स स्टॉपपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनीही आता प्रदीपला मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या
आभिषेक बच्चनेही दिली काश्मिर फाईल्सवर लक्षवेधी प्रतिक्रिया, म्हणाला, चित्रपट चांगला नसता तर…
३ मुलांच्या आईवर मध्यरात्री प्रेम करताना समोर आला तिचा पती, पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
रतन टाटांना भारतरत्न देण्याच्या याचिकेवर जज संतापले, म्हणाले, आम्ही या प्रकरणात कोणताही…
..तर स्वत:साठी फाशीचा दोर आवळलाच समजा, मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे तक्रार करताच राऊतांचा इशारा

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now