भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या(Kirit Somiyya) हनुवटीला दुखापत झाली होती. या प्रकरणात सोमवारी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन जणांना मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.(The CISF took serious note of the attack on Somaiya)
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हल्ल्याची सीआयएसएफने गंभीर दखल घेतली आहे. यानंतर कधीही किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यास दिसता क्षणी हल्लेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सीआयएसएफच्या कमांडो विभागाला यासंदर्भातही आदेश देण्यात आले आहेत.
सीआयएसएफच्या कमांडो विभागाने किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांकडे मागितले आहे. तसेच कमांडो विभागाने यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा देखील केली असल्याचे सांगितले जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला झाला होता.
काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुकी केली होती. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा हल्ले केले आहेत. त्यामुळे सीआयएसएफने या हल्ल्यांची गंभीर दखल घेतली आहे.
सीआयएसएफच्या कमांडो विभागाला यासंदर्भात सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हल्ल्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी FIR कॉपीवर माझी खोटी सही केली आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.
या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांनी केंद्रीय गृहसचिवांची देखील भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
सभेपुर्वीच मनसेला धक्का! औरंगाबादमधील फायरब्रॅंड नेत्याचा मनसे सोडून भाजपात प्रवेश
धर्माच्या पलिकडे माणुसकीचं नातं, हिंदु मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान
‘एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर…’, राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल