अलीकडे नवनवीन घटनांमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची व्यक्तव्य चांगलीच चर्चेत आली आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्याने सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalis) व भोंगा यावरून मोठा वाद सुरू आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे.’ अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक सूचक व्यक्तव्य केले आहे.
‘राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट,’ असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेल्या “आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी काँटेंप्रेरी रिलिवेंस” या पुस्तकाचे मुख्यमंत्री ठाकरे व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते विमोचन झाले.
तसेच या कार्यक्रमात मुख्यमंत्री ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. जिकडे फायदा तिकडे तो झुकत, असल्याची टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर केली आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. अशी दैवते किती वर्षांनी, कुठे जन्माला येतात हे सांगता येत नाही. मात्र अलीकडे अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी स्वत: बद्दलच केली टीप्पणी केली आहे. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ पुस्तक विमोचन सोहळ्याला हजर राहू शकलो नाही याबद्दल दुःख आहे. मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाही, असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: बद्दलच टीप्पणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
VIDEO: हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दिल्या दणादण कानाखाली, तरीही शांतीत पार पडला लग्नसमारंभ
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ! भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, वाचा काय नेमकं प्रकरण
‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ