स्कोडा कंपनी सतत आपल्या वेगवेगळ्या गाड्यांना लॉन्च करत असते. या गाड्यांना ग्राहकांची पंसतीही तितकीच मिळते. आता नुकतीच स्कोडाने नवीन स्लाव्हिया प्रीमियम सेडान कार लाँच केली आहे. सेडान कार लाँच होताच महिन्याभरात या कारचे बुकींग 10,000 पर्यंत झाले आहे.
ग्राहकांची पसंती बघता या कारची किंमत फक्त 10.69 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. स्कोडाची नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह बाजारात येणार आहे. कंपनीने कारचा बेस अॅसक्टिव्ह प्रकार लॉन्च केला असून तो 1.0-लीटर TSI इंजिनसह येत आहे. ही कार जी मॅन्युअल आणि DSG ट्रान्समिशनसह सुसज्ज असणार आहे.
येत्या 3 मार्चला लॉन्च होणाऱ्या या कारमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारला आतापर्यंत 5 हजार ग्राहकांनी बुक केले आहे. कंपनीकडून या कारवर 4 मेंटेनन्स पॅक देण्यात आले आहेत. तसेच या कारची ओनरशिप किंमत 46 पैसे/किमी असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या कारच्या सुविधा बघता कारच्या पॅकेजमध्ये स्पेअर पार्ट्सचा, इंजिन ऑईल आणि लेबर कॉस्टचा समावेश करण्यात आला आहे. या पॅकेजची किंमत 24,999 रुपये सांगितली आहे. विशेष म्हणजे, स्कोडा स्लाव्हिया 1.0-लिटर TSI पेट्रोल व्हेरियंट अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल, या तीन ट्रिम्समध्ये सादर करण्यात येणार असून याची किंमत 16.19 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
सेडान कारमध्ये , स्पेशल गोल एअर व्हेंट्स, कॉन्ट्रास्ट कलर्समध्ये आडव्या डेकोरेटिव्ह पट्ट्या आणि काही नव्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. सांगण्यात येत आहे की, इंडिया 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत सादर करण्यात आलेली कुशक SUV नंतरची स्लाव्हिया ही दुसरी कार आहे. त्यामुळे या कारला ग्राहकांची एवढी पसंती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
मुलीच्या लग्नासाठी ७ वर्षात ५० लाखांचा फंड जमा करायचा आहे? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो
आशिकी फेम दीपक तिजोरींची मुलगी आहे फेमस बॉलिवूड अभिनेत्री, आलिया श्रद्धाही पडतील फिक्या, पहा फोटो
५ लाखांच्या बदल्यात व्हायचा १५ लाख देण्याचा सौदा, पण बॉक्समधून निघायचं भलतंच काही, पोलिसांनी केला पर्दाफाश
आशिकी फेम दीपक तिजोरींची मुलगी आहे फेमस बॉलिवूड अभिनेत्री, आलिया श्रद्धाही पडतील फिक्या, पहा फोटो