Share

कारमध्ये नग्न अवस्थेत आढळलेल्या जोडप्याच्या मृत्युचे कारण आले समोर, वाचून धक्का बसेल

गाडीचा अचानक स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील अस्वस्थ करणारी बाब म्हणजे गाडीत आढळणारे दोन्ही मृतदेह हे नग्न अवस्थेत होते. यावर पोलीस तपास करत असताना, शवविच्छेदनातून त्या दोन नग्न अवस्थेतील दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

औरंगाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या गांधेली शिवारात ही घटना घडली होती. येथे बंद कारमध्ये नग्न अवस्थेत दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. गाडीत अचानक स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याचा तपास पोलीस करत होते.

दरम्यान, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर कार मध्ये आढळणाऱ्या नग्न अवस्थेतील त्या दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. डॉक्टरांनी दोघांचा स्फोटाच्या धक्क्याने गुदमरून मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. मात्र, मृत दोघे निर्जनस्थळी कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नग्न अवस्थेत आढळणाऱ्या मृतांची नावे समोर आली आहेत. रोहिदास गंगाधर आहेर वय वर्ष 48 असून, तो जवाहर कॉलनी मधील रहिवासी आहे. तर शालिनी सुखदेव बनसोडे वय वर्षे 35 ही उल्कानगरीची रहिवासी आहे. ही माहिती पोलिसांच्या चौकशी मधून समोर आली आहे.

तसेच पोलिस तपासात कारमध्ये भाजीपाला, किराणा साहित्य आढळून आले आहे. गहू व तांदूळही जळाल्याचे दिसून आले. याशिवाय लायटर व सिगारेटची थोटकेही कारमध्ये पडलेली दिसून आली होती. कारला आतून असलेले प्लास्टिकचे आवरण जळालेले होते.

माहितीनुसार, रोहिदास हे मूळचे वैजापूर तालुक्यातील रहिवासी होते. ते कुटुंबीयांसह 2004 पासून कामानिमित्त औरंगाबादेत राहायला आले होते. पूर्वी ज्योतीनगरमध्ये राहत होते. काही वर्षांपासून ते जवाहर कॉलनीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. दोन मुली विवाहित आहेत. तर शालिनी या धुणी-भांडी करीत होत्या. तर, रोहिदास हे अथर्व बिल्डर्सचे मालक रवींद्र जैन यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होते.

क्राईम

Join WhatsApp

Join Now