काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १५’ हा सीजन पूर्ण झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कलर्स वाहिनीवरील सुपरहिट शो परत आला आहे. तो शो म्हणजे ‘नागिन’ होय. या शोचा हा ६ वा सीजन आहे. हा शो एकता कपूरच्या सुपरहिटपैकी एक आहे. त्याचबरोबर एकता कपूरचा हा सगळ्यात महागडा प्रोजेक्ट आहे.
या शोचे काहींची प्रोमो आणि फक्त २ ते ३ एपिसोड प्रदर्शित झाले आहे. यावरूनच चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्यास सुरुवात झाली आहे. या शोची कथा दररोज नवीन रोमांच आणि रहस्यांसह पुढे जात आहे. मात्र या शोमधील खरी नागिन तेजस्वी प्रकाश आहे की महेक चहल, हे अजूनही अस्पष्ट आहे.
यामागे कारणही तसेच आहे. कारण तेजस्वी ही मानधनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सर्वांचं हा प्रश्न पडला आहे की, ‘नागिन’ या शोची मुख्य अभिनेत्री कोण आहे. त्याचबरोबर शोमध्ये कोणते कलाकार हे किती मानधन घेतात याबद्दल संपूर्ण माहिती ही या लेखातून जाऊन घेऊया.
तेजस्वी प्रकाश
तेजस्वी ही ‘बिग बॉस १५’ ची विजेती आहे. या शोमध्ये ती तिच्या निरागसतेसाठी प्रसिद्ध झालेली. तेजस्वी प्रकाश ‘नागिन’ या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहे. तिच्या भूमिकेचे नाव ‘प्रथा’ हे आहे. तिची ही भूमिका चाहत्यांना खूप आवडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी ही ‘नागिन’ या शोच्या एका एपिसोडसाठी २ लाख रुपये मानधन घेते.
महक चहल
महक ही ‘नागिन ६’ मध्ये एक इच्छाधारी नागिनची भूमिका साकारत आहे. महकची ही भूमिका चाहत्यांना आवडू लागली आहे. सोशल मीडियावरील काही चाहत्यांचे असे मत आहे की, महक या शोची मुख्य अभिनेत्री आहे. ती देखील या भूमिकेसाठी कमी मानधन घेत नाही. महक ही एका एपिसोडसाठी १ लाख रुपये इतके मानधन घेते.
सिम्बा नागपाल
या शोमध्ये सिम्बा नागपाल हा मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. तो नागिन प्रथाच्या म्हणजे तेजस्वी प्रकाशच्या विरुद्ध भूमिकेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिम्बा एका एपिसोडसाठी १ लाख रुपये इतके मानधन घेतो.
सुधा चंद्रन
नृत्यांगना आणि टीव्ही अभिनेत्री सुधा चंद्रन पुन्हा एकदा ‘नागिन’ या शोचा भाग बनली आहे. या अगोदर ही सुधा ‘नागिन’ या शोचा एक भाग होती. शोमधली तिची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र प्रेक्षकांमध्ये तिच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुधा या शोची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. सुधाला एका एपिसोडसाठी ३ लाख रुपये इतके मानधन दिले जाते.
उर्वशी ढोलकिया
उर्वशी ढोलकियाची ‘कमोलिका’ ही भूमिका संपूर्ण देशात खूप गाजली होती. उर्वशी ढोलकियाही ‘नागिन’ या शोमध्ये दिसत आहे. ती सिम्बा नागपालच्या आईच्या भूमिका साकारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकिया ही एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये इतके मानधन घेत आहे.
अदा खान
अभिनेत्री अदा खान देखील या अगोदर ‘नागिन’ हा शो केला होता. ती पुन्हा एकदा या शोसोबत जोडली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदा ही एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये इतके मानधन घेत आहेत.