Share

Eknath Shinde: दोन दिवसात होणार मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटाकडून ‘या’ नेत्यांना मिळणार बंडखोरीचे गिफ्ट

Eknath Shinde Devendra Fadanvis

एकनाथ शिंदे (Eknath Shinde): नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटल्यानंतरही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. यादरम्यान, राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी देखील झाल्या. अखेर मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळाला असून येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकही पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. याठिकाणीच त्यांनी ही बैठक घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून सहा आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून नव्या सरकारमध्ये माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश असणार आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणूक पाहता मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकते.

आशिष शेलार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री होते. चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित समजला जात असल्याने आशिष शेलार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेला असल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षाकडून टीका-टिपण्णी होत होत्या. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून जोरदार टीका केली होती. तसेच राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. परंतु, पालपालकमंत्री नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.

त्यामुळेच दिल्लीवरून आल्यानंतर आज सकाळी शिंदे-फडणवीस यांनी नंदनवन बंगल्यावर एक बैठक घेतली. त्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची चर्चा करण्यात आली आहे. तसेच पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

Kapil Sibal: सुप्रीम कोर्टाकडून कोणतीच अपेक्षा उरली नाही कारण.., कपील सिब्बल यांचं रोखठोक वक्तव्य
Devendra Fadanvis: ओबीसी समाजामुळे मी घडलो आणि निवडून आलो, वाचा फडणवीसांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे 
Nitish Kumar: नितीश कुमारांनी घेतली सोनियांची भेट, काँग्रेससोबत जाण्याची शक्यता, भाजपला बसणार धक्का
Karan Mehra: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘नैतिक’ने आपल्या पत्नीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – ज्या भावासोबत ती राखी बांधायची त्याच्यासोबत…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now