बॉलिवूड अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) हिने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका व्यावसायिकाने पैशाच्या बदल्यात तिला काय विचित्र ऑफर दिली होती हे अभिनेत्रीने सांगितले आहे. ‘गरम मसाला’, ‘सिंघम 3’ आणि ‘ट्रॅफिक सिग्नल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री नीतू चंद्रा हिने एका मुलाखतीत तिच्या खुलाशांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
नीतू चंद्रा हिने सांगितले की, व्यावसायिकाने तिला पैशाच्या बदल्यात आपली सैलरीड वाइफ बनण्यास सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली, एका मोठ्या उद्योगपतीने मला २५ लाखांच्या पगारावर त्याची पत्नी बनण्याची ऑफर दिली. १३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत चित्रपट करूनही मला ना काम मिळत आहे ना पैसे मिळत आहेत.
नीतू चंद्रा तिच्या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती की, तुम्ही माझ्या कथेला ‘यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी कथा’ म्हणू शकता. कल्पना करा की मी १३ पुरस्कार विजेत्या अभिनेत्यांसोबत काम केले. मोठे चित्रपट केले. पण आज माझ्याकडे काम नाही. मला काळजी वाटत होती, इतकं काम केल्यानंतर मला या इंडस्ट्रीत नकोसे वाटू लागले आहे.
नीतू पुढे म्हणते, मी देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. होय, एक कास्टिंग डायरेक्टर होटा, मी नाव सांगणार नाही, तो खूप प्रसिद्ध आहे. ऑडिशन घेतल्यानंतर तासाभराने तो म्हणाला, ‘सॉरी नीतू, तुझ काम होणार नाही.’ याचा अर्थ तुम्ही मला नाकारण्यासाठी माझे ऑडिशन घेत आहात जेणेकरून माझा आत्मविश्वास तोडू शकाल.
माहितीसाठी, नीतू चंद्राने २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या ‘गरम मसाला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘१३बी’, ‘ओये लकी! लकी ओये!’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नीतू चंद्रा यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ‘चंपारण टॉकीज’ देखील आहे, ज्या अंतर्गत तिने ‘देसवा’ आणि ‘मिथिला माखन’ सारखे दोन चित्रपट देखील केले आहेत.
लक्षात घेण्यासारखे आहे की नीतू चंद्राला तिच्या दोन चित्रपटांसाठी पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनेत्रीने अलीकडेच ‘नेव्हर बॅक डाउन: रिव्हॉल्ट’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एवढ्या अपयशानंतरही ही अभिनेत्री प्रयत्न करण्यापासून मागे हटत नाही याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: तुम्ही ३ महिने माझं डोकं खात आहात, आता खुश आहात का? रणबीरला भेटताच नीतू कपूर खुश
आनंदाच्या भरात नीतू कपूरने शेअर केला आलिया-रणबीरचा न पाहिलेला फोटो, फोटो पाहून चाहते थक्क
नीतू कपूरच्या क्यूटीपाई डान्ससमोर रणबीर कपूर-आलिया भट्टचा छैय्या छैय्या फेल, पाहा व्हिडिओ
आज ऋषी कपूर जीवंत असते तर.., रणबीरच्या डोक्याला बाशिंग पाहून नीतू कपूर पतीच्या आठवणीत भावूक