सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा भावनिक व्हिडिओ (Video) समोर येत असतात. यामध्ये एकजण दुसऱ्या गरजूंना मदत करताना दिसतो, हे पाहून यूजर्स भावूक होऊन भविष्यात गरजूंना मदत करण्याचे आव्हान करत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मदतीचा मार्ग पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. Social Media, Video, Help, Burden, Handcart
सहसा, रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांसोबतच, काही गरीब लोक हातगाडीवर प्रचंड ओझे घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना दिसले असतील. यादरम्यान वाटेत एखादी चढण आल्यास अशा लोकांना हातगाडी ओढून नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये दुचाकीस्वार या लोकांना मदत करताना आणि त्यांची हातगाडी पुढे ढकलताना दिसत असतात.
https://www.instagram.com/reel/Cj4e4VkManV/?utm_source=ig_embed&ig_rid=cd681bad-148a-4794-8cb0-8a58b2b74126
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक बस चालक रस्त्यावर भार वाहून नेणाऱ्या हातगाडीला मदत करताना दिसत आहे. या दरम्यान बस चालक आपल्या बसच्या माध्यमातून हातगाडी हळू हळू ढकलून हातगाडीला मदत करताना दिसतो. जे पाहून सोशल मीडियावर सर्वांनीच बसचालकाचे कौतुक केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बसचा चालकही त्याच्या बसच्या वेगामुळे हातगाडी पलटी होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. युजर्स हा व्हिडीओ शेअर करून बस ड्रायव्हरचे कौतुक करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Marathi Movie : ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ सिनेमाची घोषणा! अक्षयकुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
t20 World Cup : ‘या’ ५ खेळाडूंनी बांग्लादेशविरुद्ध राखली भारताची लाज, नाहीतर वर्ल्डकपमधून बाहेर झालो असतो
Team India : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग केली? ‘या’ कारणामुळे होत आहेत गंभीर आरोप






