Share

pune : ६०० किलो स्फोटकांनीही चांदनी चौकातील पुल पडला नाही, पुण्यात मनसेची सत्ता आल्यास…वसंत मोरेंची घोषणा

vasant more

pune : पुण्यातील मोठी रहदारी असणाऱ्या कोथरूडजवळील चांदणी चौक पुलामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला पुणेकरांना अनेक वर्षापासून सामोरे जावे लागत होते. कोथरूड, एनडीए, पाषाण, बाणेर, पौड या भागांकडे जाण्यासाठी या एकाच पुलाचा वापर होत असे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून चांदणी चौकाचा जुना पूल प्रशासनाकडून पाडला गेला.

पूल पाडण्यासाठी २ – ३ मीटर लांबीचे आणि साधारण १३५ मि.मी व्यासाचे १३०० छिद्र पाडले होते. त्यात ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी केला. तरीही पूल पूर्णपणे पाडला गेला नाही. याबाबत सगळीकडून टीकेची झोड उठत आहे.

ब्लास्ट होऊन पण हा पूल पूर्णपणे न पडल्यामुळे याबद्दल सगळीकडून प्रशासनावर टीका झाली. मात्र पूल पाडण्याचे काम ज्यांना देण्यात आले होते. त्या कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले की, या पुलाचे बांधकाम झाले असताना स्टीलचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे हे घडले असावे.

यावर पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. वसंत मोरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘६०० किलो स्फोटकं, १३५० होल, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी..गेल्या महिन्यापासून धावपळ.. केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते सगळ्यांची रेलचेल.. एवढी मोठी यंत्रणा असूनही पूल पाडू शकले नाहीत.’

चांदणी चौक पूल बांधणाऱ्या ठेकेदाराचे कौतुक त्यांनी पोस्टमध्ये केले आहे. त्यात पुढे ते म्हणाले, ‘भविष्यात पुण्यात मनसेची सत्ता आली तर पूल बांधण्याचे काम त्याच ठेकेदाराला द्यावे. आणि रस्ते बांधण्याचे काम जंगली महाराज रोड बांधणाऱ्या व्यक्तीला द्यावे, अशी शिफारस मी तर नक्की करेन.’ वसंत मोरे यांनी केलेल्या या पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर हा पूल पाडण्याचा निर्णय झाला. त्याच्या एक महिना पाच दिवसांनी हा पूल पाडण्यात आला. दिल्लीतील ट्विन टॉवर पाडणाऱ्या कंपनीला पूल पाडण्याचे काम देण्यात आले होते. १ ऑक्टोबरच्या रात्री १ च्या सुमारास हा पाडला गेला.

महत्वाच्या बातम्या-
eknath khadse : अमित शाहांनी दिल्लीत खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून ठेवलं, अन् भेटही नाकारली, वाचा नेमकं काय घडलं?
Team India: टीम इंडियाच्या विजयातही ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात मोठा खलनायक, वर्ल्ड कपमधून होणार पत्ता कट?
shivsena : उद्धव ठाकरेंसाठी रणरागिणी उतरली मैदानात; १०० कोटीचे आरोप करणाऱ्या खासदाराची केली बोलती बंद

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now