Share

VIDEO: भर लग्नात नवरीच्या प्रियकराने घातला राडा, केलं असं काही की सगळ्यांनाच बसला धक्का

Bride, Groom, Video, Wedding Ceremony, Social Media/ अनेकवेळा लग्नसमारंभात अशा घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. विशेषत: सोशल मीडियाच्या या युगात लग्नादरम्यान घडणाऱ्या अशा घटना खूप वेगाने व्हायरल होतात आणि प्रेक्षकांना असे व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. असाच एक लग्नाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वेडा प्रियकर प्रेयसीच्या लग्नाला पोहोचतो जेव्हा वधू आणि वर एकमेकांना हार घालत असतात.

तेथे पोहचल्यानंतर तो सनी देओलच्या स्टाईलमध्ये चित्रपटाचे डायलॉग्स बोलू लागतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेडा प्रियकर स्टेजवर उभ्या असलेल्या नववधूला म्हणत आहे की, काजल तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही? तू या सगळ्याची पर्वा करू नकोस. समाजाची पर्वा करू नको.

प्रियकर पुढे बोलतो, मी तुझ्यावर खरोखर प्रेम केले आहे काजल. तु खरखर सांग काजल. काजल तू खर बोल… मी… मी तुझ्यावर खूप प्रेम करतो काजल. तू सांग… तू माझ्यावर प्रेम करतेस ना? त्याचे इतके डायलॉग ऐकल्यानंतर वधूचे उत्तरही ऐकण्यासारखे आहे. नवरी म्हणते की, मी तुला ओळखतही नाही आणि प्रेमाची गोष्ट तर दूरच. येथून दूर जा.

हा व्हिडिओ पाहून कोणालाच हसू आवरता येत नाही. या लग्नाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारे मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स टाकून लोकांनी आणखी हसवण्याचा प्रयत्न केला आहे.

लग्न हा कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी खास दिवस असतो. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र लग्नामध्ये जर तुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड अशाप्रकारे येऊन सर्वांसमोर प्रेमाची कबुली देत असतील तर ती आश्चर्याचीच गोष्ट आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला नक्की कळवा.

महत्वाच्या बातम्या-
Kolhapur : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून ३ मुलांच्या आईची निर्घुन हत्या, वाचून तुम्हालाही बसेल जबर धक्का
marriage: आजोबा रॉक्स! ६० वर्षांनी लहान मुलीसोबत केलं लग्न, ३ वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले, वाचून अवाक व्हाल
Narinder Kaur : कार्यकर्त्याने प्रचार करता करता थेट महीला आमदारलाच पटवली! लग्नानंतर आता आमदार म्हणतेय….

 

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now