Share

VIDEO: डोळ्यात अश्रू अन् हातात फोटो घेऊन मंडपात पोहोचली नववधू, उपस्थित सर्व वऱ्हाडी झाले भावूक

Social media, bride and groom, video, emotional/ भारतात लग्नाच्या मोसमात वधू-वरांचे अनेक व्हिडिओ समोर येतात. कधी वर तर कधी वधू त्यांच्या मजेशीर कृत्यांमुळे व्हायरल होत असतात. मात्र नुकताच सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक वधू आपल्या लग्नाच्या मंडपात जाताना भावूक झाली आहे. यावेळी नववधूच्या हातात तिच्या दिवंगत वडिलांचा फोटो होता.

वास्तविक, हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वधूच्या वडिलांचे ती केवळ नऊ वर्षांची असताना निधन झाले होते. वधूची तिच्या वडिलांशी खूप जवळीक होती, जी या व्हिडिओमध्येही दिसते.

नववधूने आपल्या लग्नाच्या दिवशी दिवंगत वडिलांना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान वधू आजोबांच्या हातात हात घालून लग्नाच्या मंडपाच्या दिशेने जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आजोबांनीच त्यांची काळजी घेतली आणि त्यांना शिकवलं. आजोबा नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

वधूच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि हे सर्व पाहून उपस्थित पाहुणेही भावुक झाले. वधूही तिच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल झाला. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि वधूला शुभेच्छा देत आहेत.

एका युजरने लिहिले की, हा व्हिडिओ लग्नात व्हायरल झालेल्या सर्व व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे. आणखी एका युजरने लिहिले की, तुमचे वडील कुठेही असले तरी त्यांना तुम्हाला पाहून आनंद झाला असेल. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस अत्यंत खास असतो.

महत्वाच्या बातम्या-
Viral video : गरब्यात सहभागी झालेल्या मुस्लिम तरुणांना हिंदू संघटनांनी केली बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
VIDEO: नाकातून रक्त वाहत होते तरीही रोहितने मैदान सोडले नाही, ‘कॅप्टन असावा तर असा’
VIDEO: KBC मध्ये झाली अचानक अशा व्यक्तीची एन्ट्री की अमिताभ बच्चन झाले भावूक, थेट मारली मिठी

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now