रशिया आणि युक्रेनमध्ये 69 दिवसांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्याशी युद्धाच्या वेदना आयुष्यभर जोडल्या गेल्या आहेत. लिसिचान्स्क येथील 23 वर्षीय नर्स ओक्साना देखील त्यापैकी एक आहे.( the boyfriend got married in the hospital)
27 मार्च रोजी, युक्रेनियन युद्धादरम्यान, ओक्सानाच्या पायाजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला, ज्यामध्ये तिने तिचे दोन्ही पाय आणि डाव्या हाताची चार बोटे गमावली. या परिस्थितीतही तिचा प्रियकर व्हिक्टरने ओक्सानाची साथ सोडली नाही. हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये दोघांचे लग्न झाले.
या दोघांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्हिक्टर आपल्या पत्नीला उचलून घेऊन नाचत आहे. दोघांच्या आनंदात रुग्णालयातील इतर रुग्णही सामील झाले. ल्विव्ह मेडिकल असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की ओक्साना व्हिक्टरसोबत घरी जात होती. मग तिने एका माइलवर पाय ठेवला. जेव्हा ती व्हिक्टरला लँडमाइनबद्दल चेतावणी देण्यासाठी वळली तेव्हा एक स्फोट झाला.
❤️🇺🇦 Very special lovestory.
A nurse from Lysychansk, who has lost both legs on a russian mine, got married in Lviv. On March 27, Victor and Oksana were coming back home, when a russian mine exploded. The man was not injured, but Oksana's both legs were torn off by the explosion. pic.twitter.com/X1AQNwKwyu— Verkhovna Rada of Ukraine – Ukrainian Parliament (@ua_parliament) May 2, 2022
या स्फोटात व्हिक्टरला कोणतीही इजा झाली नाही मात्र ओक्साना गंभीर जखमी झाली. ओक्सानावर चार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आणि नंतर तिला नेप्रो येथे हलवण्यात आले. कृत्रिम अवयव रोपणानंतर, नवविवाहितेला ल्विव्ह येथे नेले जाईल.
ओक्साना आणि व्हिक्टर गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जेव्हा ओक्साना जखमी झाला तेव्हा दोघांनी ठरवले की आयुष्यात पुढे काय होईल हे त्यांना माहित नाही, म्हणून एकत्र राहणे आतापासूनच सुरु केले पाहिजे. युक्रेनच्या संसदेनेही ओक्साना आणि व्हिक्टरची खास प्रेमकहाणी ट्विट करून शेअर केली आणि दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
पोस्टमार्टममधून मोठा खुलासा, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत करत आहेत हे भयानक कृत्य
सेक्स, ड्रग्स आणि बरंच काही, रशियन अब्जाधीशांच्या लक्झरी सुपरयाटमध्ये असतात या सुविधा, कॅप्टनचा खुलासा
युक्रेननंतर फिनलॅंडवर रशिया करणार आक्रमण, या कारणामुळे संतापले पुतिन, पाठवले रशियन सैन्य
पतीला गोळी मारली, मुलांसमोर रशियन सैनिकांनी महिलेवर केला बलात्कार, युक्रेनच्या नेत्याने सांगितला भयानक किस्सा