गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांच्या कालपासूनच्या प्रकृतीबद्दल त्यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी पोस्टद्वारे काही माहिती दिली आहे.
प्रकाश आमटे यांना न्यूमोनिया झाल्यामुळे खूप ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या कालपासूनच्या प्रकृतीबद्दल त्यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी माहिती दिली आहे.
अनिकेत आमटे यांनी फेसबुकद्वारे एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी लिहीले की, बाबांची प्रकृती कालच्या सारखी आजही स्थिर आहे. औषध उपचाराला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ल्युकेमीया(lukemia) हा रोग असल्याने त्याची ट्रीटमेंट बरेच दिवस चालेल. त्यापूर्वी सध्या असलेले निमोनियचे इन्फेक्शन पूर्ण बरे झाले पाहिजे. आता त्यांना ताप नाही.
तसेच, आता इन्फेक्शन पूर्ण बरे होईल अशी आशा आहे, आपल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत. असे अनिकेत यांनी लिहिले आहे. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे प्रकाश आमटे यांच्या काळजीत असणाऱ्या अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत अशी काळजी देखील व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/100044230369322/posts/573849020766105/?app=fbl
प्रकाश आमटे यांच्याबद्दल माहिती म्हणजे, प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. प्रकाश आमटे यांना समाजकार्याबद्दल पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या लोकबिरादरी प्रकल्प या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी वडील बाबा आमटे यांचे समाजकार्य पुढे नेण्याचे ठरवले. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. त्यांच्या जीवनावर आधारित डॉ. प्रकाश आमटे: द रिअल हीरो हा चित्रपट देखील २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.